charkol 
विदर्भ

वा क्या बात है! राष्ट्रीयस्तरावरील चारकोल गणेश स्पर्धेत धामणगाव झळकले, अजय जिरापुरे भारतातून द्वितीय

सुरेंद्र चापोरकर

धामणगावरेल्वे (अमरावती) : प्रत्येकात काहीतरी कला दडलेली असते. फक्त ती ओळखून प्रचंड मेहनत घेऊन त्या कलेला पैलू पाडण्याची गरज असते. कलेला आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी काही संस्था सातत्याने कार्यरत असतात. आर्ट बिट्‌स फाउंडेशन, पुणे ही अशीच एक संस्था.

या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीयस्तरावरील चारकोल गणेशा ही ऑनलाइन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातील कलाकार आणि विद्यार्थी सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदा यामध्ये शंभर स्पर्धक सहभागी झाले होते. भारतभरातील या स्पर्धकांमधून धामणगावरेल्वेच्या सेफला हायस्कूलचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी भारतातून द्वितीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धकांनी फेसबुकवर ऑनलाइन सहभाग नोंदविला होता. त्यात धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे यांनी आपल्या विशिष्ट पेनवर्क व रंग माध्यमातून गणपतीचे चित्र साकार केले.

सविस्तर वाचा - धक्कादायक! एटीएम ठरताहेत कोरोना संसर्गाची केंद्रे

या स्पर्धेत त्यांचा संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक आला असून त्यांना सन्मानपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे गुणांकन स्पर्धकाचे चित्र व त्या चित्राला मिळणारे लाइक यावर अवलंबून होते. आर्ट बिट्‌स फाउंडेशन ही संस्था गेली दहा वर्षे सातत्याने कलाकार आणि नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करून देत आहे. कलाशिक्षक अजय जिरापुरे यांना मिळालेल्या यशाबद्दल सेफला परिवाराकडून कौतुक करण्यात आले.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live in relationship: प्रियकराने मृतदेहाचे केले सात तुकडे; पाय अन् डोके गायब; 'लिव्ह-इन'मुळे दुर्दैवी अंत!

VIRAL VIDEO: शिक्षिकेचा भन्नाट अंदाज! गाण्याच्या तालावर शिकवला मुलांना 'गुड टच-बॅड टच' धडा! कसा ते एकदा बघाच! व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल

Hartalika 2025 : यंदाची हरतालिका ठरणार या राशींसाठी शुभ, गौरी-शंकराची होणार कृपा !

Gadchiroli News : नाला ठरतोय जीवघेणा! पोळ्यासाठी आश्रमशाळेतून घरी आलेल्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू; पाच दिवसांतला चौथा बळी...

Dog Bite : मांजरी खुर्दमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश

SCROLL FOR NEXT