accident 
विदर्भ

थकल्याने रस्त्यालगत झोपला अन्‌ जीव गमावून बसला 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : परप्रांतातून राज्याच्या विविध शहरांमध्ये मजुरीसाठी दाखल झालेल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लॉकडाउनमुळे वाहतुकीचे साधन उपलब्ध होत नसल्याने मध्य प्रदेशात जाण्यासाठी सहाजण पायदळ भुसावळ येथून निघाले. सतत चालल्याने त्या सर्वांना थकवा आला. त्यामुळे ते सर्व रात्री रस्त्याच्या बाजूला झोपले. त्यापैकी एकाला वाहनाने चिरडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 

जिल्ह्यातील कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीत कौंडण्यपूर मार्गावर शुक्रवारी (ता. 17) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. मस्तराव संतोष विश्वकर्मा (वय 19, रा. सलैया, मध्यप्रदेश) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. मस्तरामसह एकूण सहाजण बांधकाम मजुरीसाठी काही महिन्यांपूर्वी भुसावळ येथे गेले होते. मजुरी करून काही पैसे त्यांनी जमा केले. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात सर्वत्र लॉकडाउनची घोषणा झाली. संचारबंदी लागू झाली. वाहतूक बंद झाली. अशा स्थितीत जिवाची पर्वा न करता मस्तरामसह अन्य पाच असे सहाजण भुसावळ येथून पाच दिवसांपूर्वी पायदळ गावी जाण्यासाठी निघाले.

मोटारसायकल गेली अंगावरून

अमरावती जिल्ह्यातून मध्यप्रदेशातील कटनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलैया संभारी या गावी त्यांना जायचे होते. रात्रभर चालत ते मध्यरात्री कौंडण्यपूर मार्गापर्यंत आले. प्रचंड थकवा आल्याने या सहाही जणांना रस्त्याच्या कडेला झोप लागली. पहाटे पुन्हा पायदळ निघण्याचे त्यांनी ठरविले होते. थकल्याने सर्वांनाच गाढ झोप लागली. तेवढ्यात शुक्रवारी (ता. 17) पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास लाइट नसलेली दुचाकी मस्तरामच्या अंगावरून गेली. दुचाकीस्वार न थांबता पळून गेला. गंभीर जखमी मस्तरामला उपचारासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास मस्तरामचा मृत्यू झाला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Viral News: मुंबई मेट्रोत मांजरीला लागली 'नोकरी'! MMMOCL ने दिलं Chief Feline Officer पद, ड्युटीही ठरवली

Hospital Fire Audit : आरोग्य विभागाचे वरातीमागून घोडे; अमरावती दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट

Mehkar Hospital Negligence : मेहकरमध्ये रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटरवर रस्त्यावर प्रसूती; आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत नाकारल्याने संताप

Marathi News Live Updates : एका व्यावसायिक इमारतीत आग

IND vs SL: 'तू वेळ वाया घाववतोय ब्रो...', सर्फराज खानची श्रीलंकन कर्णधाराला स्लेजिंग, Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT