He tore his shirt to lodge a complaint with the police Amravati crime news 
विदर्भ

...अन् मास्कसाठी त्याने फाडले शर्ट; हतोडीने दात पाडल्याचा आरोप

संतोष ताकपिरे

अमरावती : जी बाब कधी कधी सुरक्षित व्यक्तीच्या लक्षात येत नाही, त्यावर सर्वसामान्य गरीब व्यक्ती कारवाईच्या भीतीपोटी का होईना प्रशासकीय आदेशाची तातडीने अंमलबजावणी करतात. त्याचा प्रत्यय पोलिस आयुक्तालयाचे परिसरात घडलेल्या घटनेवरून आला.

एका अशिक्षित गरीब व्यक्तीजवळ मास्क नव्हते, अशा अवस्थेमध्ये तो दुपारी बाराच्या सुमारास हाती तक्रारीचा एक कागद घेऊन पोलिस आयुक्तालयाच्या आत आला. आधी त्याला प्रवेशद्वारावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी मास्क नसल्याबद्दल हटकले. तरीही तो तक्रार देण्याचे कारण पुढे करून स्वागत कक्षापर्यंत पोहोचला.

तेथे ड्युटीवर तैनात पोलिस कर्मचाऱ्याने चेहऱ्याला मास्क न बांधल्यामुळे त्या व्यक्तीला परत पाठविले. त्याआधी तोच व्यक्ती फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेला होता. परंतु, तेथेही चेहऱ्याला मास्क नसल्यामुळे पोलिसांनी त्याला परत पाठविले. असे त्याने आयुक्तालयात पोहोचल्यानंतर पोलिसांना सांगितले. परंतु, येथेही त्या व्यक्तीवर तसेच संकट ओढवले. परंतु, तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचीच या उद्देशाने तो पेटून उठला.

पुन्हा स्वागत कक्षापासून आयुक्तालयाच्या बाहेर गेला. मास्क जवळ नव्हते. खिशात नवीन मास्क घेण्यासाठी पैसेही नव्हते. त्यामुळे त्याने कशाचीही पर्वा न करता आपल्याच शर्टाची एक बाही अर्धी फाडली व त्याचा तुकडा चेहऱ्याभोवती मास्क सारखा गुंडाळला आणि तो पुन्हा आयुक्तालयातील स्वागतकक्षापर्यंत पोहोचला. अखेर ड्युटीवरील कर्मचाऱ्याने तक्रार देण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीला येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत नेले. त्यावेळी त्याने तक्रार दिली.

हतोडीने दात पाडल्याचा आरोप

त्या व्यक्तीजवळ असलेल्या तक्रारीत कुटुंबातील सदस्यांनी घराच्या मुद्यावरून त्याच्यासोबत वाद घातला व हतोडीने तोंडावर वार करून दात पाडले, असा त्याच्या तक्रारीचा आशय होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT