murder 
विदर्भ

अनैतिक संबंधात तो ठरत होता अडसर, दिली तिने त्याची सुपारी 

सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : विवाहानंतरही प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पन्नास हजार रुपयांमध्ये पतीच्या खुनाची सुपारी दिली. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. 

हनुमंत प्रकाश साखरकर (वय 40) यांचा मृतदेह गुरुवारी (ता. 20) जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पात्रात एका पोत्यात आढळून आला. मंगरुळदस्तगीर पोलिसांनी मृत हनुमंताच्या पत्नीसह तिचा मित्र उमेश सावळीकर (वय 36) या दोघांना शुक्रवारी (ता. 21) रात्री अटक केली. या व्यतिरिक्त अन्य दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. चौकशीनंतर विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराने या खुनाचा कट रचल्याची कबुली दिली. 

प्रेमात अडसर असलेल्या पतीचा काढला काटा

उमेश सावळीकर याचे एक वर्षापासून हनुमंत साखरकर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाची चाहूल पती हनुमंतला लागली. त्यातूनच साखरकर दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे आपल्या प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकर उमेशच्या मदतीने पन्नास हजार रुपयांमध्ये त्याच्या खुनाची सुपारी देऊन कट रचला, असे तथ्य चौकशीतून पुढे आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. साखरकर यांचा खून करणाऱ्यांची नावे अटकेतील दोघांनी मंगरुळदस्तगीर पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्याआधारे दोन पथक नियुक्त करून इतर जिल्ह्यांत रवाना केले. 

मृतदेह पोत्यात भरून वर्धा नदीत फेकला

14 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री हनुमंत याचा वायरच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून वर्धा नदीच्या पात्रात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात हत्या करणारे अद्याप पसार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अटक केलेल्यादोघांना मंगरुळदस्तगीर पोलिसांनी शनिवारी (ता. 22) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (ता.26 ) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: कोस्टल रोडचा दहिसर-विरारपर्यंत विस्तार होणार! मुंबईसह पर्यटकांना मोठा लाभ; काय आहे नियोजन?

AUS vs IND, T20I Series: टीम इंडियाच्या मार्गातील मोठा अडथळा झाला दूर; ऑस्ट्रेलियन संघातून धोकादायक फलंदाज बाहेर

Bank Job : मोठा निर्णय! तुमच्या जिल्ह्यातल्या बँकेत तुम्हाला मिळणार नोकरी! ७० टक्के जागा रहिवाशांसाठी राखीव, कसा करायचा अर्ज? पाहा

KYC Problem: केवायसी करायला, डोंगरावर चला! मोबाइल नेटवर्क शोधण्यासाठी कळंकीतील नागरिकांची धावपळ

Latest Marathi News Live Update : मुस्लिम दुबार मतदारांवर ठाकरेंचं पांघरून - आमदार आशिष शेलार

SCROLL FOR NEXT