Health advice given by a doctor 
विदर्भ

सुदृढ आराेग्य हवे? दरराेज बीट, गाजरसह लिंबू खा अन् काकडी, तळलेले पदार्थांपासून दूर रहा, वाचा सविस्तर

मनीषा मोहोड

नागपूर : पावसाळ्यात नेहमीच बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बीट, गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काकडी, तळलेले पदार्थापासून दूर राहण्यासाठी सागितले जाते. पचनक्रिया सुरळीत हाेण्यासाठी दरराेज एक लिंबू आहारात असायला हवा, असा सल्ला आहारतज्ञांनी दिला आहे.

पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला व ताप हे आजार डोकेवर काढतात. सध्या कोरोनाची भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहणे अधिक गरजेचे झाले आहे. यासाठी संतुलित व हलक्या आहाराला प्राधान्य द्यावे.

पावसाळ्यात विविध आजारांविषयी नागरिकांना माहिती असते. मात्र, पावसाळ्यात आहार कोणता घ्यावा, याची पुरेशी माहिती घेतली जात नाही. चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी त्रास देण्याची शक्यता असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे खूप खावेसे वाटले तरी अन्नाचे पचन मात्र चांगले होत नाही. या ऋतूत पचनास अतिशय हलका असलेला आहार घ्यायला हवा. काहीवेळा खूप खाल्ल्याने पोटाच्या व्याधी निर्माण होतात. त्यामुळे आहाराकडे दुर्लक्ष करू नये.

पचनासाठी हलका आणि सकस आहार घ्या

  • पचनास हलका आहार घ्या
  • तळलेले पदार्थ खूप खाऊ नका
  • मांस, अतिउष्ण पदार्थांचा अतिरेक टाळा
  • पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नका
  • सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरे, बडीशेप यांचा समावेश करा
  • ताप वा अन्य आजारांत मूग डाळीचे वरण, भाताची पेज, मऊ फुलके खा
  • धान्याच्या लाह्या, मुगाच्या डाळीचे कढणही पोषक आहे.
  • फळ भाज्या स्वच्छ करून खा
  • आहारात तूपाचा समावेश आवर्जून करा

पाेळी नको भाकरी खा

पावसाळ्यात दोन्ही वेळेचा आहार लवकर घेतला पाहिजे. जेवनात रोज एक लिंबू खाल्यास अनेक आजार दूर राहतात. आहारात फळभाज्यांचा वापर करावा. तसेच पोळीऐवजी भाकरी खाणे अधिक फायदेशीर ठरेल.

आजारी व्यक्तींनी असा घ्या आहार

  • पचनास हलके असे सूप, मऊ केलेली भाताची पेज घ्यावी
  • सफरचंद शक्‍यतो टाळावे
  • नारळपाणी पिऊ नये
  • बीट किंवा गाजर खावे
  • काकडी खाऊ नये, तळलेले पदार्थ टाळावेत

जड किंवा चमचमीत पदार्थ खाऊ नका
आजारातून उठल्यावर त्वरित जड किंवा चमचमीत पदार्थ खाऊ नका. या पदार्थांमुळे पुन्हा आजार बळावतो. डॉक्टरांना औषधानुरूप कोणता आहार घ्यायचे हे विचारणे गरजेचे आहे.
- कविता गुप्ता,
आहारतज्ज्ञ, नागपूर.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT