विदर्भ

प्रेरणादायी सेवा! घरी सहा महिन्यांची चिमुकली अन् सहा महिन्यांपासून भेट नाही

प्रतीक मालवीय

धारणी (जि. अमरावती) : घरी सहा महिन्यांची चिमुकली (Six month old girl); पण कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भामुळे तिची सहा महिने भेट नाही. कुटुंबीयांशी संवाद होतो तो व्हिडिओ कॉलच्या (Video call) माध्यमातून. मात्र, साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी रुग्णसेवेत खंड पडू दिला नाही. मोगर्दाच्या उपकेंद्रातील आरोग्यसेवक राजेंद्र चकुले यांची ही निरंतर सेवा अनेकांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. परिस्थिती बघून धारणीच्या प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनाही गहिवरून आले. (health workers perform uninterrupted service in Amravati)

चकुले हे मुलीच्या जन्मानंतर एकदाच घरी जाऊन आले. त्यानंतर पुढील सहा महिने त्यांचा कुटुंबीयांशी केवळ व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला. प्रकल्प अधिकारी श्रीमती सेठी यांनी नुकतीच या कोविड केअर सेंटरला भेट दिली असता ही बाब त्यांच्या निदर्शनात आली. गत आठवड्यात कोविड केअर सेंटरला श्रीमती सेठी पोहोचल्या असता एका रुग्णाचा चकुले यांच्याशी वाद झाल्याचे त्यांना कळले.

आपल्याला घरी जायला परवानगी मिळावी, असे रुग्णाचे म्हणणे होते. अजूनही रुग्णाला काही दिवस सेंटरमध्ये थांबण्याची आवश्‍यकता असल्याचा त्यांचा आग्रह होता. चकुले हे प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हणाले की, मॅडम, रुग्णाला केअर सेंटरमध्ये थांबण्याची गरज होती. कारण, त्याची जोखीम पुरेशी कमी झालेली नव्हती. या रुग्णाला घरी सोडण्याबाबत इतरांचेही फोन आले. मात्र, मी सगळ्यांना साफ नकार दिला.

रुग्णाचा उपचार कालावधी संपल्याशिवाय व प्रकृतीत सुधारणा झाल्याशिवाय सोडणार नाही. ती माझी जबाबदारी आहे. आरोग्यसेवकाची ही कर्तव्यनिष्ठा पाहून प्रकल्प अधिकाऱ्यांनी कौतुक केले व चकुले हे निरंतर सेवा बजावत असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आपण जोखमीच्या ठिकाणी काम करतो. कुटुंबाला व चिमुकलीला आपल्यापासून संसर्ग होऊ नये म्हणून घरी जात नसल्याचे सांगताना चकुले यांचे डोळे पाणावले होते. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या घटनेचा फेसबुकवरील लेखनात विशेष उल्लेख केला. धारणी येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विकास गवई हेही अविरत सेवा देत आहेत. त्यांचाही कौतुकास्पद उल्लेख प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला.

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जिवावर उदार होऊन खंबीरपणे अविरत रुग्णसेवा देत आहे. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच कोरोनावर मात करता येईल.
- मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी धारणी

(health workers perform uninterrupted service in Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं!

शिक्षण विभागाचा अफलातून निर्णय! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता शिक्षक नोडल अधिकारी; नेमके काय आहे प्रकरण..

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

Box Office: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची पहिल्या दिवशीची कमाई किती? मराठी शाळा प्रेक्षकांना भावली!

RO-KO ला अडवणं आता अवघड! २०२६ मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा किती वन डे सामने खेळणार? कोणत्या प्रतिस्पर्धींना भिडणार?

SCROLL FOR NEXT