Hearing in the High Court on the petition of Minister Yashomati Thakur 
विदर्भ

मंत्र्यांच्या प्रतिमेवर एवढा काय परिणाम होणार?, यशोमती ठाकूर प्रकरणावर कोर्टाची विचारणा 

योगेश बरवड

नागपूर ः महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेविरोधातील अर्जावरील सुनावणीदरम्यान मंत्र्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या प्रतिमेवर एवढा काय परिणाम होणार? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने  केली.

आठ वर्षे जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांच्या तीन कार्यकर्त्यांना अमरावती सत्र न्यायालयाने तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षा स्थगित करण्याची विनंती केली आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान शिक्षेमुळे काय परिणाम होईल अशी विचारणा न्यायालयाने केली. 

त्यावर वरिष्ठ विधिज्ञ सुबोध धर्माधिकारी, ॲड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडताना सामजात जाताना शिक्षेचा डाग प्रतिमा मलीन करणारा ठरत असल्याचा युक्तिवाद केला. गत सुनावणीप्रसंगी न्यायालयाने यशोमती ठाकूर यांना सुनावण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देत सरकारला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. 

सरकारचे शपथपत्र आणि याचिकाकर्यांकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे न्यायालयासमोर येऊ शकली नाहीत. संपूर्ण रेकॉर्ड रीतसर न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी निश्चित केली आहे.

२४ मार्च २०१२ रोजी मारहाणीची ही घटना घडली होती. यशोमती ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत चुनाभट्टीकडून गांधी चौकाकडे केवळ एकबाजूच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या (वन वे) मार्गाने जात होत्या. कर्तव्यावरील पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे यांनी त्यांना थांबविले. 

यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्यासह सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने चारही जणांना शिक्षा ठोठावली. यानंतर चौघांनीही जामीन मिळविला.

संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

Pune Municipal Election : ''माघार घेतली म्हणून मंत्री निवडून आला, शब्द देऊन फडणवीसांनी दगा दिला''; भाजप कार्यकर्ता आता अजितदादांच्या पक्षाकडून लढणार

Latest Marathi News Live Update : आपच्या शहराध्यक्षाचा सायकल वरून येऊन निवडणुक अर्ज दाखल

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह; कुत्र्यांनी कुरतडून चेहरा केला विद्रूप, हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ असं काय घडलं?

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

SCROLL FOR NEXT