हिंगणा तालुक्‍यातील वलनी येथील तलावातील पाणीसाठ्याचे दृश्‍य.
हिंगणा तालुक्‍यातील वलनी येथील तलावातील पाणीसाठ्याचे दृश्‍य. 
विदर्भ

धरण व तलावांना वरुणराजाचे "वेटिंग' 

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा(जि.नागपूर) : मॉन्सून दाखल होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. तालुक्‍यात सद्यस्थितीत सरासरीच्या 55 टक्‍के पाऊस पडला. धरण व तलावात अद्याप मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. यामुळे पिण्याच्या पाणी संचयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वरुणराजा केव्हा बरसणार, असा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे. 
हिंगणा तालुक्‍यात मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे. 7 जूनपासून मृगनक्षत्र सुरू झाले. रिमझिम पावसाने मॉन्सूनला सुरुवात झाली. आता अडीच महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही केवळ रिमझिम पावसातच तालुक्‍यात पडत आहे. शेतीसाठी रिमझिम पाऊस उपयोगाचा असला तरी धरण व तलावात अद्यापही पाणीसाठा उपलब्ध झाला नाही. वरुणराजाचे दमदार आगमन झाले नाही तर धरण व तलावात उपलब्ध पाणी तोकडे पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे तालुक्‍यात 13 तलाव आहेत. यापैकी कालडोंगरी, येरणगाव, वलनी, उमरी वाघ, चिचोली पठार तलावात मुबलकसाठा उपलब्ध झाला आहे. सातनवरीमधील चार तलावात 25 टक्‍के, मांडवा 47 टक्‍के, पोही 40 टक्‍के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. वेणा, दुर्गा, कृष्णा व नाग नद्यांना अद्यापही एकही पूर गेला नाही. पाटबंधारे विभागांतर्गत येणारे कान्होलीबारा बीड बोरगाव, मोहगाव झिल्पी या तलावातही जवळपास 40 टक्‍के जलसाठा झाला आहे. सन 2018 मध्ये 575.2 मिमी पावसाची सरासरी होती. शेतीपूरक पाऊस पडत असला तरी तलाव व धारणांना वरुणराजाची प्रतीक्षा लागली आहे. 

मंडळनिहाय पावसाची आकडेवारी 
गावाचे नाव पाऊस मिमीमध्ये 
* हिंगणा 617.9 
*कान्होलीबारा 492.8 
*वानाडोंगरी 617.9 
*गुमगाव 622.2 
*टाकळघाट 555.9 
* अडेगाव 448.2 
*एकूण 3317.6 
*सरासरी 552.9 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT