सोयाबीन e sakal
विदर्भ

अमरावतीत पावसाची संततधार, सोयाबीन पिकावर संकट

सकाळ वृत्तसेवा

अचलपूर (जि. अमरावती) : सततचा पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीनवर (rain affect soybean) आता संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत. या वातावरणामुळे सोयाबीनवर खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. (heavy rain affect soybean in achalpur of amravati)

जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याकरिता कृषी कर्मचाऱ्यांना जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील पावसानंतर सोयाबीनची पेरणी केली, त्या शेतकऱ्यांचे पीक सद्यस्थितीत वीस ते तीस दिवसांचे झाले आहे. त्यामुळे या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली, अशा सोयाबीन पिकावरसुद्धा पुढील काही दिवसांत या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सोबतच चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता या किडींचे व्यवस्थापन करावे, जेणेकरून सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येणार नाही.

पिकांच्या उपाययोजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका स्तरावरील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळीच सोयाबीन पिकावरील किडी ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  • एकूण शेतीक्षेत्र : ६ लाख ८८ हजार हेक्टर

  • सोयाबीन : २ लाख २६ हजार हेक्टर

चक्रीभुंगा व खोडमाशीमुळे संत्रा फळगळ व सोयाबीन प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात हा संदेश पोहोचण्याकरिता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तसेच कृषीसहायक यांना हार्डकॉपी कृषी वार्ताफलक ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रसिद्ध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
-प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी, अचलपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT