Khamgan flood  sakal
विदर्भ

Buldhana Rain: पावसाने उडविली खामगावकरांची झोप, अनेक गावांचा संपर्क तुटला; इनोव्हा गेली वाहून!

Maharashtra Rain Update: पाऊस सारखा सुरूच असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेऊनच बाहेर पडण्याची गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

Khamgao Flood Update: खामगाव शहर व तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे सर्वांची झोप उडाली आहे.  अखंडित पावसामुळे खामगाव तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला असून शहरातील मुख्य रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने रस्ते वाहतुकीस बंद झाले असून वाहतूक खोळंबली आहे.

तर ग्रामीण भागात अनेक गावात पाणी शिरले असल्याची माहिती आहे. खामगाव चा बुलढाण्याशी संपर्क तुटला असून बुलढाणा खामगांव मार्ग बंद आहे. रोहना परिक्षेत्रातील नदी नाले पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान पाऊस सारखा सुरूच असून नागरिकांनी घराबाहेर पडताना माहिती, व काळजी घेऊनच बाहेर पडण्याची गरज आहे.

   बुलढाणा जिल्ह्यासह खामगाव तालुक्यात रविवार सात जुलैला सायंकाळीं पावसाला सुरुवात झाली. दरम्यान रात्रभरापासून पाऊस अखंडितपणे सुरू आहे. यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. खामगाव शहरातील बोर्डी नदी ओसंडून वाहत असून फरशी, सुटाळा, घाटपुरी येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे. यामुळे नांदुरा रस्ता बंद झाला होता.

तर फरशी परिसरातील मढी परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने दिसून आले. खामगावकरांनी अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पाहलां असून यामुळे मात्र अनेकांची गैरसोय झाली आहे.

    तसेच तालुक्यात झालेल्या मुसळधार पाण्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे. गारडगांव येथे बाप लेक अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तहसीलदार व  गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या. त्यानुसार तलाठी व स्थानिक नागरिकांनी आधी जेसीबीने काढण्याचा प्रयत्न केला. नंतर मोठी पोकलेंड मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना, तलाठी व स्थानिकांनी  दोराच्या साहाय्याने त्या बाप लेकांना पुरातून सोडविण्यात यश आले. पिंप्री  गवळी या गावाजवळील आवरचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होता. तसेच गावात पाणी घुसले असल्याची माहिती मिळताच आमदार फुंडकर यांनी तहसीलदारांना वेळ पडल्यास गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला तयारीत राहण्यास सांगितले. तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.

सध्या पिंपरी गवळी गावातील पुराचे  पाणी उतरले असून अंत्रज , नागापूर, हिवरखेड, व ज्ञानगंगा सह आदी नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. दरम्यान अखंडित पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे तसेच शेतात पाणी शिरून पिकांचे व शेतीचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

    तर खामगाव चा बुलढाण्याची संपर्क तुटला असून बुलढाणा खामगांव मार्ग बंद आहे. रोहना परिक्षेत्रातील नदी नाले पुलावरून वाहत असल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यामुळे दोन्ही बाजूने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सुटळा पुलावरून इनोव्हा कार व टपरी गेली वाहून

बोर्डी नदीला आलेल्या पुरामुळे येथील खामगाव नांदुरा रोडवरील सुटाळा जवळील पुलावरून पाणी वाहत होते. दरम्यान पाण्याच्या प्रवाहामुळे तुला लागत असलेली टपरी व एक इनोव्हा कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT