Heavy rains expected in Gondia district till Saturday 
विदर्भ

ओल्या दुष्काळाचे सावट गडद, शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता

मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : हलक्‍या धानाच्या कडपा शेतात मळणीसाठी तयार असताना परतीच्या पावसाने जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. बुधवारीदेखील तिरोडा तालुक्‍यातील मुंडीकोटा परिसरात तसेच अन्य बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कडपा ओल्या झाल्या असून, ओल्या दुष्काळाचे नवे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत (ता.17) विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर हलक्‍या व भारी धानपिकाची लागवड केली. हलक्‍या धानपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही बहरात होते. अशातच सध्या हलके धानपीक काढणीला आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणीसुद्धा केली आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा शेतात आहेत. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. 

आठवडाभरापूर्वी परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेकडो हेक्‍टरवरील हलक्‍या धानाच्या कडपा ओल्याचिंब झाल्या होत्या. वादळवाऱ्यामुळे भारी धानालाही चांगलाच फटका बसला. हे धान जमिनदोस्त झाले. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

दरम्यान, आज, बुधवारी तिरोडा तालुक्‍यातील मुंडीपार व परिसरात तब्बल अर्धा तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची धावाधाव झाली. मळणी केलेले धान ओले होऊ नये, म्हणून ताडपत्री झाकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. याच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या कडपा शेतात आहेत. या कडपादेखील ओल्याचिंब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. 

सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे सर्वेक्षण करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 


संपादन  : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

Numerology : 'या' 4 मुलांकाचे लोक असतात खरे मित्र; कधीच कुणाला देत नाहीत धोका, आयुष्यभर जपतात माणसं

काँग्रेसकडून युद्धाचा राजकीय फायद्यासाठी वापर, जनतेचा जीव धोक्यात टाकतायत; PM मोदींचा घणाघात

Pune Drowning: सोरतापवाडीतील विहिरीत पोहताना २० वर्षीय तरुणाचा दम कोंडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

SCROLL FOR NEXT