high court order to accept bail amount of varavara rao 
विदर्भ

वरावरा राव यांच्या जामिनाची रक्कम स्वीकारा, उच्च न्यायालयाचे गडचिरोली न्यायलयाला निर्देश

केतन पळसकर

नागपूर : नक्षली चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या वरावरा राव यांच्या जामिनाचे ५० हजार रुपये स्वीकारून त्यांना सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गडचिरोली सत्र न्यायालयाला दिले. जामिनाची रक्कम प्राप्त होताच ई-मेल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स सुविधांच्या माध्यमातून त्यांच्या जामिनाचे आदेश मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहाला पाठविण्याचे निर्देशसुद्धा न्यायालयाने या आदेशामध्ये नमूद केले आहेत.

वरावरा राव सध्या मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यापूर्वी, २३ फेब्रुवारी रोजी ८२ वर्षीय वरावरा राव यांची उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव तात्पुरत्या जामिनावर सुटका केली होती. मात्र, ते तेलंगणा येथील रहिवासी असल्याने गडचिरोली न्यायालयाने त्यांच्या जामिनाची रक्कम स्वीकारण्यास दोनदा नकार दिला होता. वरवरा राव यांची बाजू मांडताना अ‌ॅड. फिरदोस मिर्झा आणि अ‌ॅड. निहालसिंग राठोड यांनी वरावरा राव यांना येणाऱ्या अडचणी उच्च न्यायालयासमक्ष मांडल्या. याचिकाकर्ते वरावरा राव यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असून त्यांना जामिनाची रक्कम जमा करण्याची मुदत देखील द्यावी, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयाला केली. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने १ मार्च रोजी याच धर्तीवर दिलेला आदेश त्यांनी न्यायालयासमोर सादर केला. त्यानुसार, न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ देत जामीन देण्याचे आदेश गडचिरोली न्यायालयाला दिले. या प्रकरणी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT