high court order to manoharbhai patel engineering college for paying 5 crore  
विदर्भ

प्रफुल्ल पटेलांच्या महाविद्यालयाला न्यायालयाचा दणका, एका आठवड्यात ५ कोटी भरण्याचे आदेश

केतन पळसकर

नागपूर : गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. हे महाविद्यालय खासदार प्रफुल्ल पटेल यांचे असून त्यांची पत्नी वर्षा पटेल या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. गेल्या २० महिन्यांपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याने येत्या सात दिवसांमध्ये ५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. याबाबत वरूणकुमार चौधरी यांच्यासह ९४ महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

याचिकेनुसार, गोंदिया एज्युकेशन संस्थेचे मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांचे २० महिन्यांपासूनचे एकूण २४ कोटी रुपये वेतनापोटी थकीत आहे. संस्थेने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयोगानुसार वेतन थकबाकी दिली होती. मात्र, प्राध्यापकांना यापासून वंचित ठेवण्यात आले. तर, शिक्षण संस्थेने महाविद्यालय बंद करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे अर्ज केला. विद्यापीठाने शिक्षण संस्थेचा अर्ज नाकारला. यानंतर संस्थेने शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी दिली. नियमित वेतन मिळत नसल्यामुळे दाखल याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने नियमित वेतन देण्याचे आदेश दिले होते. 

दरम्यान, शिक्षण संस्थेने महाविद्यालयामध्ये २०१८, २०१९, २0२0, २0२१ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाच नाही. यानंतरही महाविद्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित राहून काम करायचे. मात्र, त्यांना वेतन मिळत नव्हते. महाविद्यालयानुसार, २0 महिन्यांची दहा कोटी रुपये थकबाकी महाविद्यालयावर आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी ३३ कोटींचा दावा याचिकेद्वारे केला आहे. शिक्षण संस्था २४ कोटी रुपये द्यायला तयार झाली आहे. यातील ५ कोटी रुपयांची रक्कम येत्या ७ दिवसांमध्ये न्यायालयात किंवा कर्मचाऱ्यांना वेतनापोटी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पुढील सुनावणी ५ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राम परसोडकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

संपादन - भाग्यश्री राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT