file photo 
विदर्भ

दुसऱ्याच्या पत्नीवर होता त्याचा डोळा, पतीपासून दूर ठेवण्यासाठी रचला हा कट

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एका व्यक्तीचा दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा होता. आपला उद्देश साधण्यासाठी त्याने एका महिलेस 20 हजार रुपये देऊन, तिला त्या महिलेच्या पतीविरुद्ध अत्याचाराची तक्रार देण्यास भाग पाडले. त्यामुळे या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला. परंतु गाडगेनगर पोलिसांनी एका निर्दोष व्यक्तीला फसविण्याचा डाव मोठ्या शिताफीने हाणून पाडला. ओळखीतील व्यक्तीच्या पत्नीवर डोळा ठेवून हा डाव रचणाऱ्या युसूफ खान अजिज खान (वय 45) याला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे.

युसूफचे परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीकडे येणे-जाणे होते. संबंधित व्यक्तीच्या पत्नीवर त्याचा डोळा होता. परंतु तो व्यक्ती युसूफसाठी अडथळा ठरत होता. त्यामुळे तिच्या पतीला अधिकाधिक दिवस घराबाहेर ठेवण्यासाठी युसूफने योजना आखली. तो जेथे काम करीत होता, तेथील एका महिलेला त्याने विश्वासात घेतले. संबंधित व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास तिला सांगितले. परंतु तिने स्वत: हे काम न करता मैत्रिणीकडून पोलिसात तक्रार दाखल करवून घेतली. गाडगेनगर ठाण्यात 4 जून 2020 रोजी एका महिलेने तक्रार केली. तक्रारीत पीडितेने तिला एका व्यक्तीने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून नवसारी ते चांगापूर फाट्याजवळ झुडपात नेले. तेथे पाणी पिण्यासाठी देऊन बेशुद्ध करून त्या व्यक्तीने 20 मे रोजी अत्याचार केला, असा आरोप केला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर गाडगेनगर ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या नावाचे दोन व्यक्ती एकाच परिसरात राहत होते. त्यातील एका व्यक्तीला सुरुवातीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याला संबंधित महिलेने ओळखले नाही. त्यामुळे त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला आणण्यात आले. या दरम्यानच्या काळात तक्रार देणारी महिला व युसूफ खानचा प्लॅन पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला.

दोघांची घेतली उलटतपासणी

पोलिसांनी या दोघांची उलटतपासणी घेतली असता त्या दोघांनी तक्रार दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू पोलिसांपुढे मांडला. त्यामुळे एका निर्दोष व्यक्तीला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातून बाहेर काढणे पोलिसांना शक्‍य झाले. युसूफ खानने खोटी फिर्यादी म्हणून जिला उभे केले. तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून युसूफ खानला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून बी फायनल

अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयापुढे मांडला जाईल. पोलिस त्यासाठी बी फायनलचा वापर करतील, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

एकीला 20, दुसरीस 10 हजारांचा लाभ

एका निर्दोष व्यक्तीविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेला युसूफ खानकडून 20 हजार रुपये तर, जिच्या माध्यमातून ती आली तिला 10 हजार रुपये देण्यात आले होते. याचा भंडाफोड युसूफ खानला अटक केल्यानंतर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

SCROLL FOR NEXT