अमरावती : बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना पथक. 
विदर्भ

तब्बल तीन दिवसांपासून तिसऱ्या बेपत्ता व्यक्तीची शोधमोहीम...तरीही पत्ता लागेना

संतोष ताकपिरे

अमरावती : वलगाव जवळील आमला येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या तिघांपैकी दोघांचा शोध लागला. मात्र तिसरा व्यक्ती गेल्या तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतरसुद्धा अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे कालपासून ड्रोन कॅमेराची मदतसुद्धा घेतली जात आहे.

३ ऑगस्टच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. ३ ऑगस्टला पहाटे दोन वाजता ही माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या आदेशावरून पहाटे पाचला पथक रवाना झाले.

शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नानंतर दिवसभरात दोन मृतदेह शोधून बाहेर काढले. मात्र तिसऱ्या व्यक्तीचा अद्यापही शोध लागलेला नाही. सतीश भुजाडे, असे त्या व्यक्तीचे नाव असल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

१२ किमीचा परिसर पिंजून काढला

शोध व बचाव पथकात हेमंत सरकटे, योगेश घाडगे, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, अर्जुन सुंदरडे, दीपक डोरस, संदीप पाटील, उदय मोरे, राजेंद्र शाहाकार, अजय आसोले, प्रफुल्ल भुसारी, महेश मांदाळे, वाहन चालक वाहिद शेख व अयुब खान यांचा समावेश आहे. आतापर्यंत तब्बल १२ किलोमिटरचा परिसर त्यांनी पिंजून काढला आहे.


जेसीबीच्या माध्यमानेसुद्धा शोध सुरू

बुधवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शोध व बचाव पथक सकाळी आठ वाजतापासून रेस्क्‍यू करीत असताना स्वतः तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार दिनेश बडीये रेस्क्‍यू टीम सोबत होते. आज सुमारे सात किलोमिटर परिसरात शोध घेण्यात आला. प्रशासनाकडून जेसीबीच्या माध्यमाने सुद्धा शोध सुरू आहे. मात्र, अद्यापही त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT