Accident News Esakal
विदर्भ

Accident News: अमरावतीतील चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी

चिखलदरा येथे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अमरावतीतील चिखलदरा येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. परतवाडा ते चिखलदरा मार्गावर मोथा गावाजवळ चारचाकी खोल दरीत कोसळली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या अपघातात मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतक व जखमी आंध्रप्रदेश येथील असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कार अनियंत्रित झाल्यामुळे ती100 फुटापेक्षा जास्त खोली असलेल्या दरीत कोसळली आहे.

कोकणात जाताना गणेश भक्तांच्या एसटीला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरती एस.टी .बस आणि कंटेनर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. एस.टी बसने कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला आहे. माणगाव जवळ असणाऱ्या रेपोली येथे पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या भीषण अपघातात एस.टी बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर, 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस अन् तेल कधी स्वस्त होईल? अमेरिका-इराण युद्ध संपायला किती वेळ लागेल?

आरोग्याचे ‘बाळ’कडू : थायराॅइडविषयक आजार

Koyna Dam: शासनाचा मोठा निर्णय! कोयना धरणातील पाणी उपशावर बंदी; परिस्थिती चिंताजनक, ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

ढिंग टांग : बैठकीची मसलत..!

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार?; ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; पक्ष एकसंध असल्याचा राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT