Hot water was thrown at the young man 
विदर्भ

सोयरिकीच्या वादातून शिवीगाळ, मग केले असे...

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सोयरिकीच्या वादात अंगावर गरम पाणी टाकण्यात आल्याने तरुण जखमी झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील सावर येथे घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. रघुसिंग लक्ष्मण पवार (वय 40, रा. बोरीअरब, ता. दारव्हा) असे जखमीचे नाव आहे. 

दिवाळी झाली की लग्नसराईला सुरुवात होते. उन्हाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे नसतात. शिवाय मुलांच्या शाळांना सुट्या असल्याने या दिवसांत लग्न काढण्याचा ग्रामीण भागत कल असतो. उन्हाळ्यात लग्नसमारंभ उरकण्यासाठी सध्या वर आणि वधू संशोधन जोरात सुरू आहे. शनिवार रविवारच नव्हे तर आठवड्यातील कोणत्याही दिवशी सोयरिकीसाठी बैठकी होत आहेत. 

विवाहासाठी सोयरिक जोडणे हे तसे दिव्यच काम आहे. सोयरिकीचा वाद अनेकदा विकोपालाही जातो, अशीच घटना सावर येथे घडली. रघुसिंग पवार व विजय पवार यांच्यात सोयरीकीच्या कारणातून वाद झाला. त्यामुळे विजयने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तो एवढ्यावरच शांत झाला नाही. तर त्याने घरातून गरम पाणी आणून रघुसिंगच्या अंगावर टाकले.

यात दोन्ही पाय जळाल्याने रघुसिंग जखमी झाला. सोयरिकीचा वाद विकोपाला जाऊन घडलेल्या या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली. याप्रकरणी रघुसिंग पवार याने यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विजय पवार (वय 50, रा. सावर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT