house buried 70 feet below ground in chandrapur ghuggus video goes viral  
विदर्भ

VIDEO : अरे बापरे! चंद्रपुरात डोळ्यादेखत ७० फूट जमिनीत गाडलं गेलं घर

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : राज्यात सनासुदीचे वातावरण असताना चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. चंद्रपूर शहराला लागत असलेल्या घुग्गुस गावात एक घर अचानक ७० फूट जमिनीमध्ये गडप झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोसळा खाणींचा भाग असलेल्या आमराई वार्डात हा प्रकार घडला असून लोकांच्या नजरेसमोर घर गडप होण्याच्या या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आमराई वार्डात गजानन मडावी यांचं घर होतं. दरम्यान या घराला अचानक हदरे बसू लागल्याचं लक्षात आले त्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतली. दरम्यान, घरातून बाहेर पडताच हे घर ७० फूट जमिनीत गडप झालं.दरम्यान या अचानक घडलेल्या प्रकारमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखीलनागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

दरम्यान, सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर ७० फूट खोल जमिनीत गडप होण्याची ही पहिलीच घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT