Suicide
Suicide 
विदर्भ

अर्धा एकर जमिनीच्या तुकड्यावर जगावे कसे? उचलले हे पाऊल... 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : पवनी तालुक्‍यातील केसलवाडा येथील शेतमजुराने शुक्रवारी, 17 जानेवारीला सायंकाळी दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत एका मुलीसह पित्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. 

प्रमोदने घेतली विहिरीत उडी

अड्याळजवळील केसलवाडा येथील प्रमोद रामचंद्र बारसागडे (वय 40) याच्याकडे अर्धा एकर शेती आहे. तो मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका चालवीत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी व दोन मुली होत्या. प्रमोदला काही वर्षांपासून मानसिक आजार जडला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी त्याने दोन्ही मुलींसह घरी जेवण केले. त्यानंतर दोन्ही मुलींना कडेवर घेऊन त्याने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेतली. दोन लहान मुलींसह शेतमजुराने विहिरीत उडी घेतल्यामुळे गावकरी गोळा झाले.

एका मुलीला वाचविण्यात यश 

कुणाल देवानंद रामटेके व गावकऱ्यांनी मिळून तिघांनाही बाहेर काढले. मात्र, तत्पूर्वीच प्रमोद आणि त्याची छोटी मुलगी सानवी बारसागडे (वय दीड वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. शर्वरी बारसागडे (वय चार वर्षे) हिला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. तिला अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. अड्याळ पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर पित्यासह मुलीचा मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT