kondeshwar 
विदर्भ

अमरावतीजवळील कोंडेश्वर टेकडीवर आढळला मानवी सांगाडा अन्‌ उलगडले गुढ... 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मागील 39 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कोंडेश्वर येथील टेकडीवर सोमवारी, 29 जूनच्या दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मानवी सांगाडा आढळला. सायंकाळी त्या मृत व्यक्तीची ओळख पटली. 

राजेश गणेश जोध (वय 48, रा. चैतन्य कॉलनी) असे सांगाडा आढळलेल्या मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. 20 मे 2020 पासून राजेश जोध यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. रागाच्या भरात राजेश जोध यांनीही घर सोडले. ते व्यवसायाने चालक होते. त्यांनी आपले वाहन कोंडेश्वर येथील मंदिराजवळ उभे केले. ते पोलिसांनी जप्त केले.

नातेवाइकांच्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद बडनेरा पोलिस ठाण्यात घेतली. परिसरात दुर्गंधी पसरल्यामुळे ही बाब सोमवारी, 29 जून रोजी उघडकीस आली. मृत व्यक्तीच्या शरीराचे लचके वन्यप्राण्यांसह कुत्र्यांनी तोडले होते. घटनास्थळी वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्डसह इतर दस्तऐवज सापडले. पोलिसांनी त्याआधारे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना घटनास्थळी पाचारण केले. त्याआधारे अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. घातपाताची शक्‍यताही पोलिस पडताळून बघत आहेत. 

कोंडेश्वरच्या टेकडीवर आढळलेला सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन शवागारात पाठविला. राजेश जोध यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, ही बाब शवविच्छेदन अहवालावरून स्पष्ट होईल. 
पंजाब वंजारी, पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike India : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका ! देशात LPG सिलिंडर दरात वाढ, जाणून घ्या आजचे ताजे दर

Sports News: अपयशी कर्णधाराचा शिक्का लागला असता; राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचे मत

Pimpri Education News: डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक संशोधनावर चर्चासत्र

Akola News:क्रीडा शिष्यवृत्तीतही बॉक्सरांचाच दबदबा; जिल्ह्यातील ४३ खेळाडूंपैकी तब्बल २१ बॉक्सरांची निवड

Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

SCROLL FOR NEXT