विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात शंभर वीजबळी; अशी घ्या काळजी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू (Many died due to lightning) होतो. बहुतांश वेळी विजेच्या कडकडाटांसह पाऊस सुरू असताना बरेच व्यक्ती पावसापासून बचाव करण्यासाठी उंच झाडांचा आधार घेतात. अशावेळी नेमकी वीज झाडावर कोसळल्याने नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे. सहा वर्षांत नैसर्गिक वीज कोसळून जिल्ह्यात १०१ व्यक्तींचा बळी (101 people die) गेला आहे. (Hundred-people-die-in-power-outage-in-Yavatmal-district)

पावसाळ्याच्या दिवसांत शेतीकाम करताना वीज कोसळल्याने सर्वाधिक मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. बचाव आणि सुरक्षा आदींबाबत काळजी घेतल्यास दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात. वादळवारा किंवा विजा चमकतात त्यावेळी घरात असल्यास घराच्या खिडक्या आणि घराचे दरवाजे बंद ठेवाव्या. तसेच घराच्या खिडक्या कुंपणापासून दूर राहावे, मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच राहावे.

आपण जर घराबाहेर असल्यास त्या वेळेस सुरक्षित निवाराच्या ठिकाणी मजबूत इमारतीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. ट्रॅक्टर, शेती अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर राहावे. वाहन चालवत असल्यास सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करावा. उघड्यावर असल्यास शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा, मोकळ्या तसेच लटक्या विद्युत तारांपासून दूर राहावे आणि वीज पडल्यास वज्राघात झाल्यास त्वरित रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय मदत बोलवावी, अशाप्रकारे काळजी घेतल्यास वीज पडून मृत्यू टाळता येऊ शकतो.

घरात असल्यास अशी घ्या काळजी

वायरद्वारे जोडले गेलेले इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये, आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे हे कार्यसुद्धा करू नये. काँक्रीटच्या ठोस जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये, विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा आणि अधांतरी लटकणाऱ्‍या केबल्सपासून दूर राहावे, अशा बाबींचे आणि दक्षता घेतल्यास नक्कीच वीज कोसळून होणाऱ्‍या जीवितहानीच्या घटना आपण टाळू शकतो, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

वर्ष मृत्यू (एक एप्रिल ते जून महिना)

२०१४ २२

२०१५ ०६

२०१६ १५

२०१७ ३०

२०१८ ०२

२०१९ ११

२०२० ०६

२०२१ ०९

Hundred-people-die-in-power-outage-in-Yavatmal-district

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT