soybeans were soaked.jpg 
विदर्भ

अरे देवा! सोंगताना वाचवलं, पण ऐन विकताना गाठलचं...शेतमाल भिजला पावसात

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : ऐन सोयाबीन सोंगणीच्या वेळी परतीचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे जिवाचे रान करून काही प्रमाणात सोयाबीनचे पीक वाचविले. मात्र, त्यानंतर हेच सोयाबीन बाजार समितीत विक्रीस आणल्यानंतर अखेर पावसाने गाठून ओले केलेच. त्यामुळे सोंगताना वाचविलेलं पीक विकताना ओलं केल्याच्या प्रतिक्रिया बुधवारी (ता.13) शेतकऱ्यांमधून उमटल्या.

जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. गतवर्षी ऐन सोंगणीच्या काळातच पावसाने मुक्काम ठोकला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले होते. मात्र, अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पीक वाचविले. मात्र, हेच घरातील सोयाबीन बुधवारी (ता.13) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणले. मात्र, दुपारनंतर अचानक सोसाट्याची हवा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला.

या पावसामुळे बाजार समितीच्या आवारात खाली टाकलेले शेकडो क्विंटल सोयाबीन पावसात भिजल्या गेले. यामध्ये काही सोयाबीन लिलावानंतर मोजण्यासाठी पोते भरले जात होते. मात्र, ऐनवेळी आलेल्या पावसामुळे कुणाला काहीच करता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून जपलेले सोयाबीन अखेर बाजार समितीत विक्री करताना ओले झाले. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले.

‘शेतकऱ्यांचे नुकसान टाळा’
अचानक आलेल्या पावसामुळे बाजार समितीच्या आवारात विक्रीस आलेला शेतमाल ओला झाला. त्यामुळे या शेतमालाचा लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तो पाडून घेऊ नये, नसता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होईल. ही बाब पाहता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने पावसात ओल्या झालेल्या शेतमालाला दुखील योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात आली आहे.

का भीजतो शेतमाल पावसात!
येथील बाजार समितीमध्ये कृषी माल लिलावासाठी टिनशेडचे ओटे उभारण्यात आले आहेत. मात्र, या ओट्यांवर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीस आणलेला शेतमाल खाली रस्त्यावरच टाकावा लागतो. त्यामुळे अचानक पाऊस आल्यास शेतकऱ्यांचाच शेतमाल ओला होऊन, त्याचे नुकसान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT