file photo 
विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्डवर उपासमारीचे संकट, वर्षभरापासून मानधन थकीत

सुनील पतरंगे

भद्रावती (जि. चंद्रपूर) : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील होमगार्डांना त्यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे होमगार्डांचे सर्व थकीत मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मागणी होमगार्डनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील होमगार्डांनी आपल्या काही न्याय्य मागण्याही शासनदरबारी पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

एक ऑक्‍टोबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंतचे कायमस्वरूपी बंदोबस्ताचे, तर सप्टेंबर ते डिसेंबर 2019 पर्यंतच्या साप्ताहिक कवायतीचे भत्ते अद्याप होमगार्डांना मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारनेही होमगार्डांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

ज्या महिला होमगार्ड ज्या पोलिस ठाण्याअंतर्गत राहतात, त्यांना त्यांच्या भागात बंदोबस्तासाठी लावण्यात यावे, कायमस्वरूपी बंदोबस्त निधीअभावी बंद करण्यात आला. तो पूर्ववत सुरू करण्यात यावा, कोरोना काळात 45 वर्षांवरील होमगार्डला बंदोबस्तात घेण्यात आले नाही. त्यांना बंदोबस्तात घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.


होमगार्डना अनुभवपत्र द्या

त्याचप्रमाणे पोलिस भरतीत होमगार्डला अनुभव विचारला जातो. हे लक्षात घेऊन त्यांना अनुभव पत्र देण्यात यावे, या मागण्याही करण्यात आल्या. दिवाळीत आर्थिक गरज लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व होमगार्डना त्यांचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी अमोल नागपुरे, आझाद वाघमारे, नीलेश शेरकी, विठ्ठल धाबेकर, निखिल सातारकर, सचिन घाईत, भारती उंदिरवाडे, पुष्पा कुक्कुडवार यांची उपस्थिती होती.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT