strike
strike 
विदर्भ

माजी आमदार आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आमरण उपोषण

मनोहर बोरकर

एटापल्ली (जि. गडचिरोली) : सुरजागड पहाड़ीवरून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या अपघातातील मृतांच्या नातेवाहिकांना नुकसान भरपाई, नोकरी व लोहखनीज कायम स्वरूपी उत्खनन व वाहतूक बंद करण्याच्या मागणी घेऊन आदिवासी विद्यार्थी संघटनाचे नेते  माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरु करून मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आन्दोलनका इशारा देण्यात आला आहे.

गुरूपल्ली गांव जवळ सुरजागड पहाड़ीवरून लोहखनीज वाहतूक करणारा ट्रक व बस मध्ये झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा (ता 16जानेवारी) बुधवारला मृत्यु झाला होता,  त्यानंतर प्रक्षोभक जमावाने पंधरा ट्रकला आगी लाऊन जाळून टाकले होते, व सुरजागड पहाड़ीवरील अवैध लोहखनीज उत्खनन बंद करने तसेच मृतांचे नातेवाहिकाना शासकीय नोकरी व नुकसान भरपाई दिल्या शिवाय मृतक प्रकाश पत्रुजी अंबादे याच अंत्यविधी करण्यात येणार नाही अशा मागण्या घेऊन माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम,विविध पक्ष संघटना व ग्रामसभांचे वतीने वनविभाग नाक जवळ आंदोलन उभारण्यात आले होते, 

सदर आन्दोलनाची दखल घेऊन जिल्हा पालकमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मृतकांचे नातेवाहिक व आन्दोलक यांचे सर्व मागण्या राज्य शासनाच्या वतीने मान्य करण्यात येत असून लोहखनीज वाहतूक करणारी कंपनी लॉयलड मेटल कडून प्रत्येकी मृतांच्या कुटुंबाला  25 लाख रुपये नुकसान भरपाई व एक व्यक्त्तिला शासकीय नोकरी तात्काळ देण्याचे, जखमिंना मोफत उपचार व आर्थिक मदत तसेच लोहखनीज उत्खनन व वाहतूक कायम स्वरूपी बंद केले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र घटनेला डीड महिन्याचा कालावधी होऊनही कोणत्याही कुटुंबाला पूर्ण आर्थिक मदत देण्यात आली नाही, नोकारीचेही काही प्रयत्न होतांना दिसून येत नाही, लोहखनीजाची वाहतूक (ता 4) सोमवार पासून उत्खनन व  वाहतूक सुरु करण्यात आली असल्याने शासन व प्रशासनकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप दीपक आत्राम यांनी केला असून मागण्या मान्य केल्या शिवाय उपोषण मागे घेणार नाही अशा इशारा माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी निवेदनातून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT