Bhandara kardha family Suicide e sakal
विदर्भ

३ वर्षीय चिमुकल्यासह कुटुंबीयांचा आत्महत्येचा प्रयत्न, पती-पत्नीचा मृत्यू

अभिजीत घोरमारे

भंडारा : घरगुती भांडणातून पतीने आपल्या पत्नीसह ३ वर्षीय चिमुकल्याला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दुर्दैवाने पती-पत्नीचा मृत्यू झाला. पण, सुदैवाने ३ वर्षीय चिमुकला बचावला आहे. जिल्ह्यातील कारधा (Kardha Bhandara) येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

महेंद्र शिंगाडे (वय ३८) आणि मेघा शिंगाडे (वय ३०) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. ते कारधा येथील रहिवासी होती. त्यांच्यामध्ये घरगुती कारणावरून वाद होता. राग अनावर झाल्याने पतीने आपल्या पत्नीसह ३ वर्षीय चिमुकल्याला जाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महेंद्र आणि त्यांची पत्नी जास्त भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चिमुकल्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शेजाऱ्यांना घटना समजताच त्यांनी कारधा पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांना घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी अधिक तपास कारधा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT