IFS officer shivkumar arrested from nagpur in dipali chavan suicide case in melghat of amravati 
विदर्भ

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणात समोर आले धक्कादायक कारण, आएफएस अधिकाऱ्याला नागपुरातून अटक

संतोष ताकपिरे

अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी आएफएस अधिकारी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हेशाखा व धारणी पोलिसांनी नागपूर येथे शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली असून शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःच्या बंदुकीमधून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चार पानांची चिठ्ठी धारणी पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अमरावती एम.एस.रेड्डी यांच्या नावे सदर चिठ्ठी दीपाली चव्हाण यांनी लिहिली आहे. कुणाच्याही ऐकण्यावरुन वारंवार निलंबित करणे, चार्जशिट दाखल करण्याची धमकी शिवकुमार यांच्याकडून मिळत होती. पुनर्वसनाची जबाबदारी असल्यानंतर ग्रामस्थांसमोर अनेकदा आपली बाजू ऐकून न घेता शिवकुमार यांनी शिवीगाळ केली. रजा कालावधीमधील सुट्टी नाकारण्याची शिफारस सुद्धा त्यांनी केली होती, असे दीपाली यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानाच्या चिठ्ठीत नमुद केले आहे. त्यानुसार शिवकुमार यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी (ता. २५) रात्रीच गुन्हा दाखल झाल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी सांगितले. 

...अन् गर्भपात झाला -
गर्भवती असताना उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी मालुरमध्ये कच्च्या रस्त्याने फिरवीले. त्यामुळेच गर्भपात झाला. त्यानंतर रजा सुद्धा दिली नाही. अमरावतीत सासर असताना महिन्यातून एकदाही घरी जाता आले नसल्याची खंत दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतुन व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT