Incidents of atrocities against women and girls in rural areas are on the rise 
विदर्भ

लैंगिक अत्याचारातून युवतीला गर्भधारणा, पुढे घडला हा प्रकार...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ग्रामीण भागात युवती, महिलांवरील अत्याचार, छेडखानीच्या घटना सतत वाढत असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन युवतींवर अत्याचार झाला असून, एका अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला. महिला, मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आसेगाव ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील युवती (वय 20) एकटी घरी असताना दुपारच्या सुमारास तिच्या घरात बळजबरीने प्रवेश करून संशयित आरोपी विठ्ठल प्रभाकर आमझरे (वय 30) याने तिच्यावर अत्याचार केला.

घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन, तिचा लैंगिक छळ सुरूच ठेवला. पीडित युवतीला गर्भधारणा झाल्यानंतर आमझरे याने तिला टाळण्याचा प्रयत्न सुरू केला. पीडितेच्या तक्रारीवरून आसेगाव पोलिसांनी आमझरेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

दुसरी अत्याचाराची घटना चिखलदरा तालुक्‍यातील एका गावात घडली. 19 वर्षीय पीडित युवती ही नेहमीच बकऱ्या चारण्यासाठी जंगलात जात होती. संशयित आरोपी पिंटू उर्फ विलास गोपाल तांडीलकर (वय 30) याने तिचा पाठलाग केला. जंगलात गाठून तिच्यावर जबरीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित युवतीने चिखलदरा पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला.

घटनेची वाच्यता करू नये म्हणून पीडितेला पिंटू ऊर्फ विलासने जबर मारहाण केली. चिखलदरा पोलिसांनी पिंटूविरुद्ध अत्याचार, मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल केला. आसेगाव व चिखलदरा ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या दोघांनाही संबंधित पोलिसांनी अटक केली.

परतवाडा हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलगी (वय 14) रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना, संशयित आरोपी राकेश सोमा साकुमे याने तेथे जाऊन पीडितेशी बळबजरीचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली असता राकेशने तेथून पळ काढला. पीडितेने त्याला पकडण्याचाही प्रयत्न केला. पीडितेच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी साकुमेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आपला जस्सी... त्यांचा जोफ्रा! Lord's वर भारत-इंग्लंड सामन्यात दिसणार वेगाची शर्यत; BCCI vs ECB आतापासूनच भिडले

Bombay Stock Exchange Journey: वडाच्या झाडाखाली सुरूवात अन्...; भारताचा शेअर बाजार आशियाचा 'आर्थिक वाघ' कसा बनला?

Thane News: पुलावर वाहतूक कोंडी कायम, प्रवासी हैराण; वाहतूक पोलिसांचा नवा प्लॅन

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

SCROLL FOR NEXT