Tantamukta Samiti 
विदर्भ

गावांत वाढली भांडणे; तंटामुक्त समित्या कागदावरच! 

राहुल मैंद

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : गावगाड्यातील तंट्याचा निपटारा गावातच व्हावा. गावखेड्यातील नागरिकांनी पोलिस ठाणे, न्यायालयाची पायरी चढू नये, पोलिस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा तसेच गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत व्हावी यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. मात्र, सुरवातीच्या काळातील या समित्यांचा उत्साह आता कमी झाला आहे. आता या समित्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. सुरुवातीच्या काळात या समित्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यासाठी काही गावांना शासनाने पुरस्कार देऊन गौरविले. परंतु सुरुवातीच्या काळातील उत्साह कालांतराने ओसरू लागला. या समित्यांमुळे गावातील अवैध व्यवसाय बंद झाले होते. आता या व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले आहेत. 

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये या समित्या केवळ नाममात्र उरल्या आहेत. गावातील वाद, तंटे आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. परिणामी समित्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. यानिमित्ताने समित्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. अलीकडच्या काळात अध्यक्ष, सदस्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण सुरू झाले. प्रतिष्ठेसाठी सदस्य झाले. परंतु नंतर वेळ द्यावा लागतो यासाठी समितीतून काढता पाय घेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यांच्यासाठी पद शोभेची वस्तू ठरली. 

तालुक्‍यात अनेक ठिकाणी अध्यक्ष, सदस्यांची पदे रिक्त आहेत. काही गावांतील अध्यक्षांनी दारू, वाळू तस्करांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच दिसत आहेत. सुरुवातीच्या काळातील समित्यांची कार्यक्षमता आता तालुक्‍यातील एकाही गावात दिसत नाही. प्रारंभी या समित्यांनी लक्षवेधक कामे केली. शासनाचा, जनतेचा विश्‍वास संपादन केला. तंटे गावातच मिटविले. त्यामुळे लोकसंख्येवर आधारित दोन ते दहा लाखापर्यंत बक्षिसे मिळविली. मात्र, अलीकडच्या काळात तंटामुक्त समित्या नावालाच शिल्लक असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 


रिक्त पदे भरा 

अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, सदस्य हे नावपुरतेच आहेत. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन तंटामुक्त समितीची फेररचना करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागा त्वरित भरून समितीला बळकटी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

 संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Anti-India Rally : बांग्लादेशात कट्टरपंथियांकडून भारतविरोधी रॅली, प्रसिद्ध हिंदू मंदिरावर बंदी घालण्याची मागणी

Mumbai News: छटपूजेसाठी पालिका सज्ज! मुंबईत ६७ ठिकाणी नियोजन; विविध सुविधा उपलब्ध

CPR Kolhapur Crime : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली बिर्याणी-नाश्ता! सीपीआर रुग्णालयात संशयितांना मिळते व्हीआयपी वागणूक?, सुरक्षा यंत्रणा मूग गिळून गप्प...

Latest Marathi News Live Update : नाशिक मुंबई महामार्गावरील इंदिरानगर बोगदा सोमवारपासून ९ महिन्यांसाठी राहणार बंद

“सलमानसोबत पुन्हा काम नाही!” ‘अंतिम’च्या सेटवर झाला होता वाद! महेश मांजरेकरांनी उघड केली सलमान खानची खरी बाजू!

SCROLL FOR NEXT