washim industries.jpg 
विदर्भ

आधीच औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेलाच अन् त्यावर आता हे उद्योगही बंद

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्याची निर्मिती होऊन एका तपाचा कालावधी उलटला असला तरी, औद्योगिक दृष्ट्या जिल्हा मागासलेलाच आहे. वाशीम येथील औद्योगिक वसाहतीत असलेले छोटे दहा उद्योग या लॉकडाउनमुळे बंद झाले असून, या लघू व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चा माल मिळत नसल्याच्या तक्रारी उद्योग मालकांकडून समोर येत आहेत.

वाशीम शहराच्या दक्षिणेला वाशीम-हिंगोली महामार्गावर औद्योगिक वसाहत आहे. गेल्या 20 वर्षांपासून कुंपन, पाणी, रस्ते, वीज यांनी सुसज्ज असलेली ही वसाहत उद्योगांअभावी ओस पडली आहे. या औद्योगिक वसाहतीत कृषीपूरक आठ ते दहा लघू उद्योग कार्यरत आहेत. प्रत्येक उद्योगामध्ये आठ ते दहा कामगारांची क्षमता आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून या उद्योगांना कच्चा माल उपलब्ध नाही. या औद्योगिक वसाहतीत जिजाऊ मॅन्युफॅक्चरींग कंपनी आहे. या कंपनीला सॅनिटायझर बनविण्याचा परवाना देण्यात आला आहे. मागणी भरपूर आहे. मात्र, यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नाही. आंतरराज्यीय वाहतूक बंद आहे. जिल्ह्याबाहेरील वाहतूकही ठप्प आहे. असाच प्रकार इतर उद्योगांबाबतही आहे.

त्यामुळे सर्व उद्योग ठप्प
जिल्हा प्रशासनाने आमच्या कंपनीला सॅनिटायझर बनविण्याचा परवाना दिला आहे. सॅनिटायझरचे रसायन उपलब्ध आहे. मात्र, ते भरण्यासाठी बॉटल उपलब्ध होत नाहीत. लॉकडाउनमुळे बाहेरून त्या मागविताही येत नाहीत. त्यामुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत.
-कृष्णा चौधरी, संचालक जिजाऊ मॅन्युफॅक्चरींग कंपनी, वाशीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT