Lakadganj Nagpur Team eSakal
विदर्भ

धक्कादायक! नागपुरात कचऱ्यात आढळले चार अर्भकं

काळ्या पोलिथिनमध्ये हे अर्भक आढळून आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नागपुरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भकं आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याच्या (Lakadganj Police Station) हद्दीत असलेल्या Qveta कॉलोनी परिसरात, जुना देवडिया दवाखान्याजवळ भिंतीला लागून चार ते पाच अर्भक आढळून आले आहे. दुपारी 3.30 वाजता हा प्रकार उघडकीस आला. काळ्या पोलिथिनमध्ये हे अर्भक होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे अर्भक 3 ते 5 महिन्यांचे असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. परिसर गजबजलेला असताना अशाप्रकारे अर्भक आढळून येणे ही बाब धक्कादायक असल्याचे समजते.

विशेष म्हणजे याठिकाणी दवाखान्यातील कचराही पडलेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक ची टीमही दाखल झाली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत, तपास सुरु केला आहे. ही अर्भकं नेमकी कुठून आली? असा प्रश्न आता उपस्थित होत असून, संपूर्ण नागपुरमध्ये सध्या या विषयाची चर्चा सुरु आहे. व्यंकटेश नायडू, सुमित पडोळे, अनिल जैन, तुषार ठाकरे या चौघांनी सर्वप्रथम हे अर्भकं बघितले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास कुणीतरी याठिकाणी हे अर्भकं फेकल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT