file photo 
विदर्भ

लम्पीची बिहार, मराठवाड्यातून विदर्भात एंट्री; उद्भवले नवीनच संकट

सूरज पाटील

यवतमाळ : सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. माणसे भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आता जनावरांनाही एका आजाराने ग्रासले आहे. राज्यातील अनेक भागांत या आजाराने थैमान घातले आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील गाय, बैल व वासरू या पशुधनावरहा या आजाराने आक्रमण केले आहे. पशुधनाच्या अंगावर गाठी दिसून येत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. 

मृत्युदर कमी असला तरी शेतकऱ्यांवर नवीन संकट घोंघावत आहे. यूपी, बिहार व मराठवड्यातून विदर्भात लम्पीची एंट्री झाल्याची माहिती पशुचिकित्सकांनी दिली. कोरोना व खरीप हंगामात दुबार पेरणी करावी लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यातच पशुधनावर लम्पीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. लम्पीची बाधा आढळल्यास तत्काळ उपचार करण्याचा सल्ला पशुचिकित्सकांकडून देण्यात येत आहे. हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्‍स या विषाणूमुळे होतो. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड आदींद्वारे हा आजार एका जनावरांपासून दुसऱ्या जनावरास होतो. 

शेळ्या-मेंढ्यांतील देवी विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या, मेंढ्यांना होत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, झरी जामणी, मारेगाव, राळेगाव, उमरखेड, पांढरकवडा आदी प्रत्येक तालुक्‍यांत दोनशे ते तीनशे गाय, बैल, वासरू यांच्यावर लम्पीने आक्रमण केले आहे. विदर्भात या आजाराची एंट्री होण्यापूर्वी मराठवाड्यात आढळून आला होता. पशुधनाच्या आयातीमुळे यूपी, बिहारमधून मराठवाडा व नंतर विदर्भात आजार पाय पसरत आहे. 
 
संकरित जनावरांना धोका
देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्‍यता जास्त असते. परंतु, मानवास जनावरांपासून हा आजार होत नाही. या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण हे साधारणतः १० ते २० टक्‍के असून, मृत्युदर अतिशय नगण्य आहे. 

आजाराची प्रमुख लक्षणे 
या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे सुरुवातीस दोन ते तीन दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. नंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रीय आदी भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठीमुळे जनावरे लंगडतात, काही अंशी श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. 

या आजाराबाबत पशुपालकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये. योग्य उपचाराने जनावरे बरी होतात. आजाराची लक्षणे जनावरांत आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत.
-डॉ. राजीव खेरडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यवतमाळ.

(संपादन : मेघराज मेश्राम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण! चांदीही 13,500 रुपयांनी स्वस्त; 22 आणि 24 कॅरेटचा ताजा भाव किती?

जॅक मॅकगर्कची १४ चेंडूंत फिफ्टी अन् १९ चेंडूंत ९६ धावा; वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात वाचला

FDAच्या अधिकाऱ्यांनी केला कोट्यवधींचा घोटाळा, ५ जणांवर निलंबनाची कारवाई; मंत्री झिरवाळांनी दिली माहिती

Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी अशी करा माता कालरात्रीची पूजा! जाणून घ्या मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप अन् महत्व...

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

SCROLL FOR NEXT