विदर्भ

लसीकरणात संसर्गाचे सावट; चाचणी व लसीकरण एकाच ठिकाणी

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोनाचा (Corona) संसर्ग होऊ नये यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ठराविक कालावधीनंतर लसीकरणाचे दोन डोज घेतल्यानंतर कोरोनाची लागण होत नाही. मात्र, राजुरा येथील लसीकरणा केंद्रावर वेगळाच प्रकार बघायला मिळत आहे. लसीकरण (corona vaccine) आणि कोरोनाच्या चाचणी एकाच ठिकाणी होत आहे. तुफान गर्दी उसळलेली असते. त्यामुळे कोरोनाची बाधा न झालेल्यांना संसर्गाचा धोका बळावला आहे. Infection with vaccination in Chandrapur district

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने जमावबंदी लावली आहे. एकापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. बिनाकामाने घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत आहे. एवढे प्रयत्न संसर्ग टाळण्यासाठी होत असताना प्रशासनाचा गलथान पणाही समोर आला आहे. राजुरा शहरात आरटीपीसीआर चाचणी केंद्र जिल्हा परिषद शाळेत आहे. अँटीजन चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरही लक्षणे असणारी संशयित कोरोना बाधित ही चाचणी करायला येथे येतात. शहरात हे एकमेव केंद्र आहे. त्याच परिसरात लसीकरणाचेही केंद्र आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात लसीकरण आणि चाचणी करणाऱ्यांची एकच गर्दी बघायला मिळते.

लस घेतल्यानंतर तिचा लगेच परिणाम जावणत नाही. पूर्ण परिणाम जाणविण्यासाठी ठराविक कालावधीत दोन ठोस घेणे आवश्‍यक आहे. राजुऱ्यात मात्र लसीकरणासाठी येणाऱ्यांनाच संसर्गाचा धोका जाणवत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळावे, यासाठी कुणीही प्रयत्न करीत नाही. या केंद्रावर नागरिकांसाठी कोणत्याही सुविधा नाही. सोबतच अंगाची लाही लाही करणारी उन्ह आहे. तिच्यापासून वाचण्यासाठी लस घेणारे आणि चाचणी करणारे एकत्रच झाडाखाली गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोणाचे संक्रमण होवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

लसीकरणासाठी येणाऱ्यांमध्ये वयोवृद्धांची संख्या मोठी आहे. कोरोणा चाचणी करणाऱ्यांपैकी पॉझिटिव्ह निघणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण आणि कोरोनाची चाचणी वेगवेगळ्या ठिकाणी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

Bedmi Puri: रविवारच्या स्पेशल नाश्त्यासाठी परफेक्ट मेजवानी; घरातच बनवा बनारसची जगप्रसिद्ध 'बेडमी पुरी'! काय आहे रेसिपी?

आजचे राशिभविष्य - २६ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT