Insects are damaging crops of farmers in wardha district  
विदर्भ

बळीराजा पुन्हा संकटात! तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा हल्ला; ढगाळ वातावरणाचा परिणाम 

रुपेश खैरी

वर्धा : गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. शेतकरी उपाययोजना म्हणून तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे, पण तरीसुद्धा अळ्यांचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी विभागाने तत्काळ बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आंतर पीक म्हणून कपाशी व तुरीच्या पिकात तूर पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. जिल्ह्यात 55 हजार हेक्‍टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. तुरीचे पीक फुलोऱ्यावरच असताच गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. हिरवी अळी तीन ते चार इंचाची असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

यंदा कापूस, सोयाबीन पीक कीडरोगाने हातचे गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांवर भिस्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. शिवाय हे पीक कमी खर्चाचे असून हमखास उत्पन्न देणारे आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे. ते शेतकरी तुरीचीच पेरणी करतात.

ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव वाढला असून फुले करपत आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. सद्य:स्थितीत शेतकरी तुरीवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. कृषी विभागाने वेळीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

सद्य:स्थिती पाहता तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनाकरिता प्रतिहेक्‍टर 20 पक्षी थांबे उभारावेत. निंबोळी अर्क पाच टक्‍के ची फवारणी करावी. कीड आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास ईमामेक्‍विंटन बेंझोएट पाच टक्‍के एस. जी. तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
डॉ. प्रशांत उंबरकर
कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा

ढगाळ वातावरणामुळे हिरवी अळी तूर पिकावर आली आहे. अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता डायमेथोएट, क्‍विनॉलफॉस किंवा क्‍लोरोफॉस 20 मिलि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून तूर पिकावर फवारणी करा.
अनिल इंगळे
जिल्हा कृषी अधीक्षक

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

प्रेयसीने साथ सोडली, त्याने जिद्द सोडली नाही! ७ वर्षांच्या संघर्षानंतर UPSC मध्ये मिळवला २३८ वा क्रमांक, कोण आहे आयुष कृष्णा?

Amravati News: मोर्शी नगरपरिषदेच्या गच्चीवर पार्टी, समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल, जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल अधिक गडद; धुळ्यात पारा १०.४ अंशांवर, तर रत्नागिरीत तापमानाने गाठला ३६.१ अंशांचा टप्पा

IND vs NZ, 5th ODI: विदर्भाच्या खेळाडूचं पदार्पण, सिराजलाही संधी, मग Playing XI मधून कोण झालं बाहेर? भारताला मालिका विजयाची संधी

SCROLL FOR NEXT