gud.j 
विदर्भ

Video : यंदा रसवंतीचे घुंगरू झाले मुके! ऊसाच्या रसाऐवजी शेतकरी घेताहेत गूळाचे उत्पादन

दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : उन्हाळ्यात थंडगार ऊसाचा रस पिला की उन्हाची काहिली दूर होते. गर्दीच्या ठिकाणी  घुंगरांचा आवाज हमखास कानी पडतो. हा आवाज असतो रसवंतीचा. उन्हाळ्यात ऊसाच्या रसाची रसवंती हमखास दिसतेच आणि लोक आवडीने रस घेतात. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या सावटात ऊसाचा रस मिळाला नाही. रसवंत्यांचा धंदा ठप्प पडला आहे. गडचांदुरातील जयदेव मुनेश्‍वर यांनी उसाची लागवड केली. पीक चांगले आले. मात्र, लॉकडाउनचा फटका त्यांना बसला. उसाची खरेदी थांबली. त्यामुळे आता ते उसापासून गूळ बनवीत आहेत.


गडचांदूर येथील शेतकरी जयदेव मुनेश्‍वर हे गेल्या पाच वर्षांपासून भाडे तत्त्वावर पाच एकर शेती करीत आहेत. या शेतात ऊस लावून आपल्या परिवाराचा गाडा चालवीत आहेत. प्रत्येकवर्षी त्यांना उसातून चांगले उत्पन्न मिळत आले आहे. यावर्षी ऊसाचे भरपूर उत्पन्न आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. प्रत्येकवर्षी ते उसाचे पीक आले की रसवंती चालवायचे. यंदा उसाचा रस विकायला मिळत नसल्याने त्यांना गूळ बनवून विकावा लागतो आहे. शहरात रसवंतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न कमविणाऱ्या शेतकऱ्याला ऊस विकायला बाजारपेठसुद्धा उपलब्ध नाही. मुनेश्‍वर यांनी बैलमपुरातील शेतातच रसवंती टाकली. शीतपेय पिणाऱ्या ग्राहकांची वाट त्यांना बघावी लागत आहे. उसाचे काय करावे म्हणून त्यांनी आता शेतातच गूळ तयार करून विकायला सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा - शू...आमच्या गावात तुम्हाला प्रवेश नाही बरं का!
शासनाने मदत करावी
गूळ आणि ऊसाच्या रसाच्या किमतीत खूप फरक आहे. खूप  तोटा होत आहे. यामुळे  शासनाने मला मदत करावी, अशी माझी विनंती आहे.
जयदेव मुनेश्‍वर, शेतकरी गडचांदूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT