file photo 
विदर्भ

प्रियकराचा झाला अपमान; प्रेयसीने काढला चाकू 

सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा)  : संतापलेल्या नागरिकांनी दोन आरोपीना चोप दिल्याची घटना तालुक्‍यातील वाढोणा येथे रविवारी (ता. 15) रात्री घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. 

दोन्ही आरोपींना फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी (ता. 16) अटक केली. येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर आरोपींची सुटका केली.

प्रीती संजय भांगे (वय 35, रा. वाढोणा) आणि किशोर उत्तमराव धनगर (वय 42, पद्मावतीनगर, आर्वी), अशी आरोपींची नावे आहेत. सुवर्णा किशोर भांगे (वय 32, रा. वाढोणा) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. 

पायी गेला प्रेयसीच्या घरी 

हे दोन्ही आरोपी मागील वर्षीच्या खुनातील आरोपी आहेत. वाढोणा तेलीपुरा येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ते खराब होऊ नये, यासाठी "कृपया गाडी येथे ठेवून पायदळ जावे' अशी विनंती एका नागरिकाने केली. त्यामुळे संतापलेला प्रियकर पायदळ प्रेयसीच्या घरी गेला. 

प्रेयसीने दिली नागरिकांना धमकी 

एका नागरिकाने मला अडविले, अशी माहिती त्याने प्रेयसीला दिली. त्यानंतर प्रेयसी घरातून चाकू घेऊन बाहेर आली. तिने काही नागरिकांना शिवीगाळ केली. मी माझ्या नवऱ्याचा मर्डर केला आहे, तुम्हाला एकेकाला पाहून घेईन, अशी धमकी तिने नागरिकांना दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेने मध्यस्थी केल्याने आरोपी प्रेयसीने तिचा हात पकडून ढकलून दिले. तसेच हाताबुक्‍क्‍यांनी तिला मारहाण केली. 

दोघेही न्यायालयासमोर हजर 

या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी प्रेयसी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक करून मंगळवारी (ता. 17) न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश त्रिवेणी गायगोले यांनी अखेर पीआर बॉंडवर आरोपींना जामीन दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा; २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT