अमरावती : रेड झोनमध्ये असतानाही अमरावतीकर मात्र बिनधास्त जीवन जगत असल्याचे दिसून आले. शनिवारी, 9 मे रोजी दुपारपासून लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूची वेळ संपताच सोमवारी, 11 मे रोजी सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
अमरावती शहरात तसेच ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारपासून जनता कर्फ्यू लागू केला. सोमवारी सकाळपर्यंत जनता कर्फ्युची मुदत ठरवून देण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन वाजताच शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली. शनिवारपासूनच शहरात "सन्नाटा' पाहायला मिळाला. संपूर्ण रस्ते निर्मनुष्य झाले होते. रविवारीसुद्धा तसेच चित्र होते. केवळ शहरातील मोजके मेडिकल स्टोअर्स व दवाखाने उघडे होते. मात्र, सोमवारी अमरावतीकर सकाळपासूनच रस्त्यावर उतरले. दूध, भाजीपाला, फळे यांसह इतर काही लहान दुकानेसुद्धा उघडली होती. या दुकानांमध्ये खरेदीसाठी अमरावतीकरांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सकाळपासूनच निर्मनुष्य झालेल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसायला लागली. अनेक ठिकाणी तर सोशल डिस्टन्सिंगचा पार बोजवारा उडाला होता.
अवश्य वाचा- ही तर माणुसकीची हद्दच! गावच्या रक्षकानेच केली विलगीकरण कक्षातील महिलेला शरीरसुखाची मागणी
एकीकडे रेड झोनमध्ये असलेल्या अमरावती शहरात कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असतानाच नागरिक मात्र अजूनही आपली जबाबदारी समजून घेण्यास तयार नसल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले. शहरातील राजापेठ, राजकमल, रवीनगर, रुक्मिणीनगर, बसस्थानक परिसर तसेच इतर भागात नागरिकांची वर्दळ दिसून आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.