विदर्भ

मृतदेहही सुरक्षित नाही; कोविड रुग्णालयातून चोरले महिलेचे दागिने

संतोष ताकपिरे

अमरावती : येथील कोविड रुग्णालयात (covid Hospital) उपचार घेत असताना कोरोनामुळे महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅम सोन्याची २२ हजारांची पोत कुणीतरी चोरली (Gold theft). मृत महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. (Jewelry stolen from dead woman body in Amravati)

बडनेरा नजीकच्या अंजनगावबारी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी तीन मे रोजी येथील कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना १९ मे रोजी महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी महिलेच्या अंगावरील दागिने दिसले नाही.

मृत महिलेच्या नातेवाइकांनी यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली. त्यानंतर गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याआधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. यापूर्वीही अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी येथे उपचारादरम्यान चोरी होत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे केल्या होत्या. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे कोविड रुग्णालयात चोरीच्या घटना वाढत आहेत.

सीसीटीव्हीची गरज

कोविड रुग्णालयाच्या कामात पारदर्शकता राहावी, रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते, याची माहिती बाहेर एका स्क्रीनवर दिसावी, यासाठी कोविड रुग्णालयात सीसीटीव्हींची संख्या वाढवावी ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही.

कोविड रुग्णालयात चोरी झाल्याच्या गुन्ह्यांची नोंद घेतली. येथे ड्यूटीवर तैनात कर्मचाऱ्यांची याप्रकरणात चौकशी होईल.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

(Jewelry stolen from dead woman body in Amravati)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT