mobile thife.jpg
mobile thife.jpg 
विदर्भ

कर्जतचे रेल्वे पोलिस बुलडाण्यात; वाचा काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : कर्जत येथील रेल्वे पोलिस पथकाने मोताळा व नांदुरा तालुक्यातील दोन युवकांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रेल्वेतून चोरी गेलेले दोन आयफोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई कर्जत रेल्वे पोलिसांनी बुधवारी (ता.19) स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल अरविंद शहा (वय 42, रा. साई सुजे गार्डन, मुकुंदनगर, पुणे) हे 23 डिसेंबर २०१९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वडोदा ते पुणे या इंदौर एक्स्प्रेसमधील एस-4 बोगीतून कुटुंबीयासह प्रवास करीत होते. रात्री जेवणानंतर शहा कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, 24 डिसेंबरच्या पहाटे सव्वा सहा वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी कर्जत स्टेशन सोडत असताना श्री शहा यांच्या पत्नीला जाग आली. तेव्हा पांढरा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन श्री शहा यांच्या पत्नीच्या उशाला ठेवलेल्या दोन हँडबॅग चोरून नेताना दिसून आला. 

94 हजारांचा ऐवज लंपास झाला होता
या महिलेने आरडाओरड केली असता, संबंधीत अनोळखी व्यक्ती चालू गाडीतून उडी मारून पळून गेला. या दोन हँडबॅगमध्ये दोन आयफोन मोबाईल (किंमत 60 हजार रुपये), एक सॅमसंग मोबाईल (किंमत 10 हजार रुपये), सोन्याचे दागिने (किंमत 12 हजार), रोख 10 हजार रुपये व दोन हजार रुपये किंमतीच्या दोन हँडबॅग असा एकूण 94 हजारांचा ऐवज लंपास झाला होता. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली. दरम्यान, चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल मोताळा व नांदुरा तालुक्यात असल्याची बाब कर्जत रेल्वे पोलिसांना तांत्रिक तपासातून समजली. दरम्यान, कर्जत रेल्वे पोलिसांच्या पथकाने बुधवारी (ता.19) बुलडाणा जिल्ह्यात धडक देऊन मिथुन उर्फ रोहित महाले (वय 24, रा. अलमपूर ता. नांदुरा) याच्या ताब्यातून चोरीच्या गुन्ह्यातील एक आयफोन व सोनू उर्फ सोहिल खान उस्मान खान (24, रा. बोराखेडी ता. मोताळा) याच्या ताब्यातून दुसरा आयफोन जप्त केला आहे. 

तपासाकडे लक्ष
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. पोलिसांनी सोनू उर्फ सोहिल खान याला विचारपूस केली असता, त्याने सदर मोबाईल दुसऱ्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. परंतु पोलिस तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही कारवाई कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय श्री डुमरे, एनपीसी हितेश नाईक, पोकाँ कुणाल तावडे यांनी केली असून, त्यांना बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ नंदकिशोर धांडे, पोहेकाँ राजेश आगाशे यांनी सहकार्य केले. पुढील तपास कर्जत रेल्वे पोलिस करीत आहेत.

इतर चार-पाच युवकांची चौकशी
कर्जत रेल्वे पोलिसांनी बोराखेडी पोलिसांच्या मदतीने इतर चार-पाच युवकांना बुधवारी बोराखेडी पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. संबंधीत युवकांचे मोबाईल तपासण्यात आले असता, कर्जत येथील चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईलशी त्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधीत युवकांना सोडून देण्यात आले, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

कर्जत ते बुलडाणा कनेक्शन?
कर्जत येथून रेल्वेतून चोरी गेलेले दोन आयफोन मोबाईल बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा व नांदुरा तालुक्यातून जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन मोबाईल चोरी गेले होते. यातील तिसरा मोबाईल कुठे आहे? याचा शोध पोलिस घेत असून, या प्रकरणाचे कर्जत ते बुलडाणा कनेक्शन कसे जुळले, ही बाब पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT