file photo
file photo 
विदर्भ

मुलाच्या अपहरण नाट्यावर पडदा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : नंदनवनमध्ये 12 वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. मात्र, गुन्हा दाखल होताच नंदनवन पोलिसांनी आठ तासात मुलाच्या अपहरण नाट्याचा छडा लावला. शेजाऱ्यासोबत शेगावला दर्शनाला गेलेला मुलगा आज, मंगळवारी सायंकाळी परतला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवन पोलिस ठाण्याच्या सुमितनगर भागात सोमवारी 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. सारिका अनिल पवार (39) नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमीतनगरात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा बारा वर्षीय मुलगा तन्मय याचे विशेष विनोद देवघरे (28) रा. द्वारकानगर, खरबी रोड या शेजारी राहणाऱ्या तरुणाने अपहरण केल्याची तक्रार सारिका यांनी पोलिस ठाण्यात दिली. विशेष देवघरे याने रविवार सकाळी 11 वाजता ते सोमवार सायंकाळी 6.30 वाजतादरम्यान अपहरण केल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्र झाल्यावरही तन्मय घरी परतला नाही. याप्रकरणी त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली. नंदनवन पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने घेत लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. नंदनवन पोलिसांनी एक पथक तैनात करण्यात केले. या प्रकरणाचा तपास पीआय विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणपत काळुसे यांनी सुरू केला. काळुसे सातत्याने मुलाच्या कुटुंबीयांसोबत संपर्कात होते. त्यांनी पळून गेलेल्या विशेष देवघरे याच्या मोबाईल क्रमांकावरून लोकेशन सर्च करण्यासह त्याच्या पालकांशी चौकशी करण्यात सुरुवात केली. अखेर तन्मय विशेषसोबत घरी परतल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
विशेषच्या वडिलांना दिली होती कल्पना
विशेष सोमवारी शेगावला जाणार होता. त्यामुळे तन्मय याची इच्छा त्याच्याबरोबर जाण्याची होती. मात्र, त्याचे पालक घरी नसल्याने तो विशेषच्या वडिलांना आपण त्याच्यासोबत जात असल्याचे सांगितले. विशेषच्या घरी तन्मयने जेवण केल्यानंतर दोघेही शेगावला रवाना झाले. मात्र, तो रात्रभर परतला नसल्याने तन्मयच्या आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्याने पोलिसांसह परिसरात खळबळ उडाली होती. आज, मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास परतल्याने अपहरणाच्या प्रकरणावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT