vikesh 
विदर्भ

अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश 

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : अंकिताला जाळून जखमी करणे नाही, तर तिला जिवानिशी ठार करणे हाच त्याचा उद्देश असल्याचे बयाण हिंगणघाटच्या घटनेतील आरोपी विकेश नगराळे याने पोलिसांना दिले आहे. सोमवारी (ता. 10) अंकिताचा मृत्यू झाल्याने त्याचा कट पूर्णत्वास गेल्याचे या बयाणातून पुढे आले आहे. 

हिंगणघाट येथील नंदोरी चौकात 3 फेब्रुवारी रोजी आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून अंकिताला जाळले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. जनभावना संतप्त झाल्या. पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासात अनेक बाबी उघड झाल्या. अंकिता पिसुड्डे आणि विकेश नगराळे हे दारोडा या गावचे रहिवासी. विकेश हा अंकितापेक्षा तीन वर्षे मोठा आहे. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी दोघेही हिंगणघाटला जाणे-येणे करायचे. एकाच गावातील असल्याने या दोघांमध्ये ओळख होती. उच्च शिक्षणासाठी अंकिता वर्ध्याला गेली. 

विकेशच्या प्रेमाला तिने दिला होता नकार

दरम्यान, मागील वर्षी विकेशचे लग्न झाले. शिक्षण आटोपून अंकिता गावात आल्यानंतर सात महिन्यांपूर्वी हिंगणघाट येथे एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू झाली होती. विकेशने तिच्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याविषयी आग्रह धरला. अंकिताने याला नकार देत आपल्या पित्याकडे तक्रार केली. येथूनच तिला मारण्याचा कट रचल्याचे त्याने पोलिसांना बयाणात सांगितले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकेशने महिनाभरापूर्वीच अंकिताला पेट्रोल टाकून निर्दयीपणे जाळून मारण्याची योजना बनविली होती. फक्त दिवस व वेळ निश्‍चित नव्हता. अखेर त्याने सोमवारी, तीन फेब्रुवारीला या घटनेला मूर्तरूप दिले. 

आजंती शिवारात बदलविले कपडे

 अंकिताला पेट्रोल टाकून जाळल्यानंतर आरोपी विकेश नगराळे याने आपल्या दुचाकीने थेट आजंती शिवार गाठले. येथील कालव्याच्या शेजारी त्याने कपडे बदलविले. कपड्यांसह इतर सर्व साहित्य तिथेच लपवून ठेवत तो टाकळघाटकडे पळाला. दरम्यान, पोलिसांना त्याचा सुगावा लागताच त्याला ताब्यात घेण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT