The labourers injured into the well in Bhandara 
विदर्भ

विहीर खचल्याने मजूर ढिगाऱ्यात दबला; दोन मजूर बचावले, मदतकार्याला सुरुवात

मुनेश्‍वर कुकडे

भंडारा : विहिरीचे खोलीकरण करीत असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने मजूर ढिगाऱ्याखाली दबला गेला; तर दोन मजूर बचावले. ही घटना शनिवारी (ता. २०) दुपारी १२ च्या सुमारास जवळच्या मुजबी येथे घडली. प्रशासनाने मदतकार्याला सुरुवात केली असून वृत्त लिहीपर्यंत मजुराला बाहेर काढण्यास यश आले नव्हते. रेवालाल भाऊलाल बारसागडे (वय ३२, रा. बीड/सितेपार) असे दबल्या गेलेल्या मजुराचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून कामासाठी येथे आला होता.

राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी येथे कोठारी मेटल कारखाना असून, या कारखान्याच्या बाजूला असलेल्या जागेत एक जुनी विहीर आहे. या विहिरीचे खोलीकरणाचे काम सुरू होते. शनिवारी या कामावर सहा मजूर होते. त्यातील तीन मजूर वरच्या भागात तर तीन मजूर विहिरीच्या आतमध्ये होते. विहिरीतील गाळ काढून ते वर फेकण्यात येत होते.

दरम्यान, दुपारी १२ च्या सुमारास खोलीकरण सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. त्यामुळे खाली असलेले तीन मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यातील दोन मजूर बाहेर निघण्यास यशस्वी ठरले. रेवालाल भाऊलाल बारसागडे हा मजूर ढिगाऱ्याखाली दबून राहिला. प्रशासनाला या घटनेची माहिती मिळताच मदतकार्याला सुरुवात झाली. दोन जेसीबी, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय चमू घटनास्थळी दाखल झाले.

दुपारपासूनच जेसीबीच्या साहायाने मजुराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळपर्यंत ४० फूट खोदल्यानंतरही मजुराचा थांगपत्ता लागला नव्हता. सायंकाळी अंधार झाल्यानंतर विद्युत दिव्यांच्या मदतीने मदतकार्य सुरूच होते. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी मीना करनवाल, तहसीलदार अक्षय पोयाम, पोलिस पथक घटनास्थळी ठाण मांडून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT