A large number of seedless lemons were grown by the farmers of Yavatmal 
विदर्भ

शेतकरी प्रयोगशील असेल तर काळ्या मातीतूनही सोने उगवतो; झाडे पिवळ्याधम्म लिंबूनी लगडली

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : शेतकरी प्रयोगशील असेल तर काळ्या मातीतून सोने उगवल्याशिवाय राहत नाही. पुसद नजीकच्या निंबी शिवारातील शिवराम शेटे यांनी दोन वर्षांपूर्वी २० गुंठ्यात लागवड केलेली १०० सिडलेस लिंबूची झाडे पिवळ्याधम्म लिंबूनी अक्षरशः लगडली आहेत. एका बहारापासून त्यांना किमान २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

निंबी हे भाजीपाला उत्पादकांचे गाव आहे. कष्टाळू शेतकरी भाजीपाल्या सोबतच खरबूज, टरबूज पिकांचे उत्पादनही काढतात. शिवारातील शिवराम शेटे हे कोबी उत्पादक शेतकरी. त्यांची कोबी शुभ्र पेढ्यासारखी व ताजीतवानी. त्यामुळे बाजारपेठेत त्यांचा कोबीचा ब्रँड प्रसिद्ध आहे. त्यांची वृत्ती प्रयोगशील. कोरोना काळाचा लाभ घेत त्यांनी वाशिम रोडवरील १० गुंठ्यात भाजीपाला रोपवाटिका सुरू केली. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

टोमॅटो, वांगी, मिरची यासोबतच ऊस व इतर पिकांचे अल्प क्षेत्रात भरघोस उत्पादन काढतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी नवीन बाजारपेठेचा मागोवा घेत वीस गुंठ्यात १०० सिडलेस लिंबूची बाग तयार केली. आता या लिंबूचा दुसरा बहार ते घेत आहेत. सध्या एकेका फांदीला लहान संत्र्याच्या आकाराची पिवळीधम्म लिंबू फळे लगडली आहेत. या लिंबूची चव आंबट गोड असून प्रत्येक फळात भरपूर रस आहे. फळांची गुणवत्ता नजरेत भरणारी आहे.

पंचतारांकित हॉटेल्समध्ये मोठी मागणी

लिंबूच्या झाडांना वर्षातून तीनदा बहार येतो. सातत्याने फुला-फळांची संख्या प्रत्येक झाडावर मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. आज रोजी एका फळ झाडावर ५० किलो लिंबू लगडलेली आहेत. उन्हाळ्यात लिंबूला चांगली मागणी असते. त्यादृष्टीने बहाराचे नियोजन करण्यात आले असून, त्यापासून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. या सिडलेस लिंबूला पंचतारांकित हॉटेल्समध्ये मोठी मागणी आहे. हॉटेल, रसवंती, बारमध्ये या लिंबूंचा वापर होतो. 

सिडलेस लिंबूचे उत्पादन फायदेशीर
गावरान लिंबू पेक्षा या झाडाला पाच पट उत्पादन अधिक होते. त्यामुळे सिडलेस लिंबूचे उत्पादन फायदेशीर आहे. या क्षेत्रातील कंपनी या लिंबूपासून सायट्रिक ॲसिड तयार करीत असल्याने लिंबूची मागणी चांगली आहे. शेतकऱ्यांनी मार्केटचा अभ्यासपूर्ण शोध घेऊन विक्री केल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
- शिवराम शेटे, शेतकरी

ठिबकद्वारे केली सिंचन व्यवस्था

सिडलेस लिंबूची झाडे निरोगी असून, ठिबकद्वारे सिंचन व्यवस्था केली आहे. तसेच शेणखताचा वापर केल्याने त्यांच्या बागेतील सेंद्रिय लिंबू रसदार व चवदार आहे. भाजीपाला शेतीला कमी क्षेत्रातील लिंबू बागेने त्यांच्या आर्थिक नियोजनाला बळ मिळाले आहे. सध्या विक्री व्यवस्था स्थानिक व बाहेरील बाजारपेठेत केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT