Last Day of Take Back Form For Gram Panchayat Election Amravati  
विदर्भ

बंडोबा होणार थंडोबा! ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस; अनेकांची मनधरणी सुरु 

सुधीर भारती

अमरावती ः येणाऱ्या वर्षात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालिम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेत सोमवार (ता.4) महत्वाचा दिवस राहणार आहे. दुपारी तीन पर्यंत नामांकन अर्ज मागे घेणाऱ्यांकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे. अनेकांनी केलेले बंड शांत करण्याचे मोठे आव्हान गटप्रमुखांसमोर उभे आहे. अर्ज माघारीसाठी अनेकांची मनधरणी सुरू असल्याची माहिती आहे.

15 जानेवारीला जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 553 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून त्या निमित्ताने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. 4 हजार 784 सदस्यपदासाठी 12 हजार 644 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.

उद्या अर्ज माघारीचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. दुपारी तीन नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर चिन्हांचे वाटप होणार आहे. सध्या कडाक्‍याच्या थंडीत ग्रामीण भागातील चहा टपऱ्या, पानठेले, कट्ट्यांवर निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगत आहे.

चिन्हासाठी मारामार

कुठल्याही निवडणुकीत प्रमुख भुमिका असते ती उमेदवाराच्या चिन्हाची. आपल्या आवडीचे तसेच सोयीचे निवडणूक चिन्ह मिळावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले असले तरी प्राधान्यक्रमानुसार निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. अनेकांची यामध्ये निराशा होणार आहे. विविध पालेभाज्यांसह सीसीटीव्ही कॅमेरे, संगणकासह कपबशी तसेच अन्य चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे.

पुढील निवडणुकीचे आमिष

पॅनेलमध्ये जागा न मिळाल्याने अनेक नाराजांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला आहे. पॅनेलसाठी धोकादायक ठरू पाहणाऱ्या उमेदवारांचे बंड शांत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेकांना पुढील पंचायत समिती किंवा जिल्हापरिषद निवडणुकीत मदत करण्याचे आश्‍वासने दिली जात आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT