last rites of martyr soldier kailas dahikar in achalpur of amravati 
विदर्भ

दीड वर्षाच्या चिमुकलीने बापाचे अंत्यदर्शन घेताच उपस्थितांनी फोडला टाहो, शहीद कैलास दहीकर अनंतात विलीन

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील शहीद कैलास दहीकर या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कैलास यांचा लहान भाऊ केवल याने प्रेताला अग्नी दिला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी उसळला होता. 'शहीद कैलास दहीकर अमर रहें' या घोषणा देत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तांचा आक्रोश वातावरणातील शांतता चिरत होता. वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी दीड वर्षाच्या चैतालीला आणताच सारेच गहिवरले. याप्रसंगी अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

कुलूमनाली येथे बुधवारी (ता.२३) सायंकाळी कैलास दहीकर हे कर्तव्य बजावत असताना तंबूला आग लागली. त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. कुलूमनाली येथून त्यांचे पार्थिव आज, रविवारी सरकारी वाहनाने पिंपळखुटा गावात पोहोचले. आपल्या गावचा सुपूत्र देशसेवेसाठी कामी आल्याचा अभिमान व्यक्त करतानाच कैलास पुन्हा भेटणार नाही, या विचाराने गावकरी अस्वस्थ होते. कैलास यांचे पार्थिव पाहताच आईवडील, पत्नी, भाऊबहीण यांनी आक्रोश केला. चार वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, डॉ. कमलताई गवई, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, पंचायत समिती सभापती कविता बोरेकार, जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर, सुखदेव पवार, आमदार केवलराम काळे, प्रभूदास भिलावेकर यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला किती कोटी रुपयाचं उत्पन्न? परिवहन मंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला!

Horoscope: उशिरा मिळतं, पण भरभरून मिळतं! ‘या’ 5 राशींचं नशीब अचानक पालटणार; पैसा-करिअरमध्ये मोठी संधी, कोणत्या राशी?

Dilip Walse Patil: मंचरमध्ये शांताबाई शेळके स्मारक उभारणार; ऐतिहासिक वाडा कोसळल्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट विधेयक आणि 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक' मांडणार

US Visa Bond Policy: अमेरिकेत नवा व्हिसा नियम लागू! 'या' ५० देशांना लाखोंचा बॉण्ड भरावा लागणार; कुणाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT