विदर्भ

पतीला वाचवण्यात लता करे ठरल्या अपयशी; बारामतीत जिंकली होती मॅरेथॉन

संतोष अवसरमोल

घाटबोरी : मेहकर तालुक्यामधील रहिवासी असलेल्या ६५ वर्षीय लता करे (Lata kare) या २०१३ मध्ये बारामतीत झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पतीच्या उपचारासाठी अनवाणी पायाने धावून स्पर्धा जिंकल्यामुळे प्रसिद्धीस आल्या होत्या. स्पर्धा जिंकून त्यांनी पती भगवान करे यांच्या हृदयविकारावर (Heart disease) उपचार करून त्यांना तर वाचवले, पण कोरोनासोबतच्या (coronavirus) लढ्यात मात्र त्या पतीला वाचवू शकल्या नाही. या लढ्यात लताबाईंच्या नशिबी अपयश आले. (Lata Kare failed to save her husband)

लता करे व पती भगवान करे हे ९ वर्षांपूर्वी बारामतीत रहायला गेले होते. भगवान करे हे हृदयविकाराने आजारी होते. त्यांच्या उपचारासाठी लागणारा खर्च त्यांच्या आवाक्यात नव्हता. त्यामुळे त्यांनी बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला व या स्पर्धेत अनवाणी धावून त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्याच्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी पतीवर उपचार केला व त्यांना वाचवले.

मात्र, पती भगवान यांना कोरोनाचा संसर्ग झाला. बारामतीच्या कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता. ५ मे च्या रात्री त्यांचे निधन झाले. कोरोनासोबतच्या याही लढाईत पतीला वाचवण्यासाठी लता करे यांनी धडपड केली. परंतु, या झुंजीत त्या हरल्या. अनवाणी पायाने धावून बारामतीतील मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्याने लता करे या केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर एक मराठी चित्रपटही निघाला. सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामतीतील स्पर्धेत भाग घेतला व प्रथम क्रमांक मिळवीत हॅटट्रिक साधली.

(Lata Kare failed to save her husband)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT