सुमेद श्यामकुवर सुमेद श्यामकुवर
विदर्भ

आणखी एका नेत्यावर अत्याचाराचा आरोप; आता राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा

अभिजीत घोरमारे

अभिजीत घोरमारे

भंडारा : राज्यात नेत्यांवर बलात्कार, अत्याचाराचे आरोप लागण्याच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे सद्या पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप (Leader accused of atrocities) करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले सुमेद श्यामकुवर असे संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. तो मागील दहा वर्षांपासून राष्ट्रवादीसाठी काम करीत आहे. नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सावरी ठाण जिल्हा परिषद क्षेत्रातून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सुमेद श्यामकुवर याचे भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात महिला समाज गर्ल्स हॉस्टल आहे. घरून हॉस्टलमध्ये नेण्याच्या बहाण्याने सुमेद याने त्याच्याच होस्टेल मध्ये दहाव्या वर्गात शिकण्याऱ्या मुलीला सुनसानजागी नेत विनयभंग केला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. सायंकाळी सुमेदने मुलीच्या वडिलांना फोन करून मुलीला हॉस्टलमध्ये नेण्यासाठी आल्याचे सांगितले. तसेच मुलीला एका ठिकाणी पोहोचवण्यास सांगितले.

स्वतः हॉस्टल संचालकच मुलीला घायला आल्याने वडिलांनी मोठा विश्वासाने मुलीला सांगितलेल्या ठिकाणी सोडून दिले. यानंतर सुमेद मुलीला कारमध्ये घेऊन गेला. यानंतर सुनसान जागी गाडी थांबवत अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Leader accused of atrocities) केला. हॉस्टेलमध्ये पोहोचताच मुलीने सर्व हकीकत मैत्रिनींना सांगितली. यानंतर मैत्रिनींनी तिच्या वडिलांना माहिती दिली. वडिलांनी आंधळगाव पोलिस स्टेशन गाठत सुमेद श्यामकुवर विरोधात गुन्हा दाखल केला.

राजू कारेमोरे यांनी कोली होती शिवीगाळ

मोहाडीचे राष्ट्रवादीचे (NCP leader) आमदार राजू कारेमोरे यांनी व्यापारी मित्राला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा जाब विचारताना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भंडारा पोलिसांनी कारेमोरे यांना अटक केल्यावर तुरुंगात जावे लागले होते. अंतरिम जामिनावर त्यांची तात्पुरती सुटका झाली. हे प्रकरण न्यायालयीन आहे. भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ॲड. जयंत वैरागडे व दोन्ही भावांवर जबलपूर महिला पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

भंडाऱ्यातील नेते चर्चेत

हे प्रकरण सुरू असताना राष्ट्रवादीचे (NCP leader) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेद श्यामकुवर याच्यावर बाल लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

SCROLL FOR NEXT