Leopard sakal
विदर्भ

चंद्रपुरात वाघानंतर बिबट्याची दहशत, आता १६ वर्षीय तरुणाला नेले, शोध सुरु

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात कामावरून सायकलने घरी निघालेल्या एका कामगाराला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना गुरुवारी घडली

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात कामावरून सायकलने घरी निघालेल्या एका कामगाराला वाघाने उचलून नेत ठार केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच गुरूवारी रात्री एका सोळा वर्षीय युवकास बिबट्याने उचलून नेले. राज भडके असे या मुलाचे नाव आहे. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही. दुर्गापूर गमपंचायतीच्या मागील परिसरात राज राहतो. गुरुवारी रात्री राज फोनवर बोलत घराकडे जात होता. त्याचवेळी बिबट्याने त्याला उचलून नेले. त्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यानंतर वनविभाग आणि वीज केंद्राच्या सुरक्षा यंत्रणेला या घटनेची माहिती देण्यात आली. यंत्रणेने शोधमोहीम राबविली. मात्र राजचा काहीच पत्ता लागला नाही. शुक्रवारी पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात बुधवारी (ता. १६) रात्री पावणे अकराच्या सुमारास भोजराज मेश्राम (वय ५०) या कामगाराला वाघाने उचलून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती. गुरुवारी सकाळी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यामुळे आता मानव-वन्यजीव संघर्षाची व्याप्ती अगदी शहरालगत येऊन पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. वीज केंद्राला लागून जवळपास दहा हजार कामगारांची वसाहत आहे. काही वर्षांपूर्वी आईसोबत फिरायला गेलेल्या एका पाच वर्षीय मुलीला बिबट्याने फरफटत नेले होते. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ही थरकाप उडविणारी घटना घडलीय.

वीज केंद्राच्या परिसरात आणि कामगार वसाहतीत बिबटे आणि वाघांचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील जंगली श्वापदांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवार या भागात वाघ फिरत आहे, अशी माहिती वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने वनविभागाला दिली होता. दुसऱ्याच दिवशी भोजराज मेश्राम यांना वाघाने लक्ष्य केले. वीज केंद्रातील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनीत भोजराज मेश्राम कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. घटनेच्या रात्री कामावरून सायकलने घरी जात असतानाच वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि जंगलात फरफटत नेले. तिथल्या सुरक्षा रक्षकांना भोजराज यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी मदतीसाठी प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत वाघाने त्यांना बरेच दूर नेले होते. वीज केंद्राच्या परिसरात झुडपी जंगल आहे. तेथे सुरक्षा रक्षकांच्या हाती भोजराज यांची सायकल लागली. वीज केंद्राच्या गेट क्रमांक १३ ची ही घटना आहे. रात्री बराच प्रयत्न केल्यानंतर शोधमोहिम थांबविण्यात आली.

चंद्रपूर वीज केंद्रात वाघाचा थरार

गुरुवारी सकाळी वनविभाग तथा वीज केंद्राच्या सुरक्षा पथकाने शोधकार्य सुरू केले तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. वाघाने भोजराज यांचे डोके धडावेगळे केले होते. त्यांच्या शरीराची अक्षरक्षः चाळणी झाली होती. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर तातडीची आर्थिक मदत म्हणून शुक्रवारी पाच लाखांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांना सोपविणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेले होते. त्यानंतर हिराई विश्रामगृहाजवळ वाघाच्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतरची ही तिसरी घटना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. येत्या शनिवारी तनपुरे वीज केंद्रात या विषयावर बैठक घेणार आहेत. वनविभागाने सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून कॅमेरा ट्रॅप लावले आहे. हल्लेखोर वाघाचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे वीज केंद्राच्या वसाहतीतील रहिवासी आणि कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे.

वनविभागाला पत्र

ताडोबा अभयारण्याच्या बफर झोन लागूनच असल्यामुळे वीज केंद्राच्या परिसरात जंगली श्वापदांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे या परिसरात वावर असलेल्या हिंस्र प्राण्यांची तत्काळ माहिती मिळावी, यासाठी वीज केंद्राच्या परिसरात ७५ कोटी रुपयांचा खर्च करून सुरक्षा प्रणाली लावण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. वाघ, बिबटे व अस्वलांना तत्काळ जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी मुख्य वनसंरक्षक यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. सपाटे यांच्या पत्रानंतरही वाघाला जेरबंद किंवा सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याच्या हालचाली अद्याप वन विभागाकडून झाल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT