go corona 
विदर्भ

छोटासा कलावंत चित्रातून करतोय कोरोनाविषयक जनजागृती

सिध्दार्थ गोसावी

कोरपना (चंद्रपूर)  : वयावर कला आणि कलावंताचे मोठेपण अवलंबून आहे. आणि कलेतून दिला जाणारा संदेशही वयावर अवलंबून नाही.
एका छोट्या गावातसा छोटा मुलगा त्याच्या चित्रातून मोठा संदेश देतो आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  देशात लॉकडाऊन सुरू आहे. शासन, प्रशासनाकडून कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. जनजागृतीसाठी आता कलाकारही पुढे सरसावले आहेत. त्यात छोटे कलावंतही मागे नाहीत.
आठव्या वर्गात शिकणा-या एका विद्यार्थ्याने आपल्या पेंटीगमधून " गो कोरोना गो " ची हाक दिली आहे. कोरपना तालुक्यातील वनोजा येथील या लहानग्या कलाकाराचे नाव सागर विनोद पेटकर आहे. हे पेटींग समाजमाध्यमांवर भलतेच व्हायरल होत आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत.

घराबाहेर निघणे जिकिरीचे झाले आहे. अशात विद्यार्थी घरातल्या घरात आपल्या अंगभुत कला गुणांची मुक्त उधळण करीत आहेत. कोरपना तालूक्यात येणाऱ्या वनोजा येथील सागर विनोद पेटकर या विद्यार्थ्याने आपल्या कलेतून गो कोरोना गो ची हाक दिली. त्याने काढलेल्या पेंटीगमध्ये सनेटायझर कोरोना वायरसला हाकलून लावतांना दिसत आहे. या पेंटींगमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  सनेटायझर,मास्कचा वापर करण्याचे आव्हान सागरने केले आहे. हे पेंटीग समाजमाध्यमांवर लोकप्रिय झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh resumes visa services: बांगलादेशच्या तारिक रहमान सरकारचा मोठा निर्णय!,भारतासोबत ‘व्हिसा’ सेवा पुन्हा सुरू

IND vs SA Super 8s: द. आफ्रिकेने 'दुखती नस पकडली'! भारताची कोंडी करण्यासाठी नेट्समध्ये 'त्या' गोष्टीवर कसून सराव; काढला हुकूमी एक्का

नितीन गडकरींच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत फसवणूक; नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने उकळले लाखो रुपये...

Latest Marathi News Live Update : राज्यातील नाट्यगृहांची अवस्था दयनीय, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडून खंत व्यक्त

आईने सोडलं, कळपानं छळलं; तरीही ‘पंच कुन’ला नवं घर मिळालं, पाहा हृदयस्पर्शी Viral Video

SCROLL FOR NEXT