The lives of the 39 passengers were briefly saved 
विदर्भ

दुचाकीचालकाला वाचवायच्या प्रयत्नात घडला हा थरार...

सकाळ वृत्तसेवा

वरठी (जि. भंडारा) : भंडारा-तुमसर मार्गावरील वरठी रेल्वेस्थानकावरून तुमसरकडे जात असलेल्या पुलावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात घडला अपघात. वरठी परिसरात असलेल्या पुलावरून तुमसर-नागपूर ही जलद बस (एमएच06 एस 8198) नागपूरकडे जात होती. दरम्यान, एक दुचाकीस्वार ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक बससमोर आला. त्याच्या जीव वाचवायच्या प्रयत्नात बस चालकाने आपले वाहन पुलावरून तब्बल 20 फूट खाली उतरवले. सुदैवाने या अपघातात एसटीमधील 39 प्रवाशांचा जीव थोडक्‍यात बचावला.

चालकाच्या सतर्कतेने दुचाकीस्वार वाचला आणि एसटीचा मोठा अपघातही टळला असला तरी हा पूल बघता या पुलाजवळ असलेल्या "सन प्लॅन आयर्न ऍन्ड स्टील' कंपनीतील वेटिंगवर असलेले कित्येक मोठमोठे टक, टिप्पर या पुलाला लागून असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लावून असतात आणि त्यामुळे इतर वाहनचालकांची तारांबळ उडते.

बस चालकांना कंपनी समोरच्या अपघात झालेल्या या परिसरात वाहन चालवायचे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. याच भागात लागून असलेल्या या पुलावर रेलिंगअभावी वारंवार अपघात होत आहेत. मागील वर्षी काही दुचाकीस्वार व त्यानंतर एकाच चार चाकीमधील कुटुंब अशा शेकडो नागरिकांचा जीव थोडक्‍यात बचावला. बसमध्ये 39 प्रवासी थोडक्‍यात बचावले असले तरी भंडारा-तुमसर महामार्गावर वरठी येथील रेल्वे स्थानकावरून गेलेला हा पूल रेलिंगअभावी अतिशय धोकादायक व जीवघेणा ठरू पाहत आहे.

जीव जाण्याच्या वाट बघता का?

या अपघातात 39 नागरिकांचा जीव सुदैवाने थोडक्‍यात बचावला. इतके अपघात होऊन सुद्धा या पुलावर नागरिकांच्या सुरक्षितेकरिता रेलिंग बसवण्यात आलेले नाहीत. प्रशासन निर्दोष नागरिकांचा जीव जाण्याची वेळ बघत आहे का? असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT