Lockdown in Amravati As many as 4,803 coronaviruses patient were found in ten days 
विदर्भ

Video : लॉकडाऊनमुळे अमरावतीत शुकशुकाट; दहा दिवसांत आढळले तब्बल ४,८०३ कोरोनाबाधित

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात वाढल्याने रविवारी (ता. २१) लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. विशेष म्हणजे, एरवी रविवारी प्रचंड गर्दी असलेल्या इतवारा बाजाराच्या मार्गावरसुद्धा एकही वाहन किंवा दुचारी दिसून आली नाही.

केवळ औषधीची दुकाने तसेच रुग्णालये सुरू असून, भाजीपाला आणि दुधासाठी सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत सूट देण्यात आली होती. सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, हॉटेल, खानावळी एवढेच नव्हे तर एसटी बसेस तसेच महापालिकेची सिटीबससुद्धा बंद होती. ऑटो व खासगी वाहतूक व्यवस्थासुद्धा बंद ठेवण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने एकही ऑटो किंवा सायकलरिक्षा रस्त्यावर दिसले नाहीत.

जिल्ह्यात लॉकडाऊन अतिशय कडकडीतपणे पाळण्यात आला. सोमवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, दहा दिवसांत अमरावतीत तब्बल ४,८०३ कोरोनाबाधित आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. २०) सायंकाळपर्यंत ७२७ नवे रुग्ण आढळून आले होते. यासोबतच एकाच दिवशी सात जणांना मृत्यू झाल्याने नागरिकांनासुद्धा चांगलाच हादरा बसला होता.

प्रमुख चौकांमध्ये खडा पहारा

संचारबंदीदरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलविली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे काल रात्रीपासूनच पोलिसांचा सर्वच प्रमुख चौकांमध्ये खडा पहारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT